Siddaramaiah Oath Ceremony : सिद्धरामय्यांच्या शपथविधीसाठी उद्धव ते ममता सर्वांनाच निमंत्रण ! काय आहे कारण ?

UPA News : काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीही राहणार उपस्थित
Mamata Banergee, Siddramaiah, Uddhav Thackeray
Mamata Banergee, Siddramaiah, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Congress Invites All Opposition Leaders : कर्नाटकमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करण्यास सज्ज झाली आहे. सिद्धरामय्या यांना कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित केले. ते शनिवारी (ता. २०) शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसने समविचारी पक्षांसह विरोधी नेत्यांना निमंत्रण पाठवले आहे. या सोहळ्याच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) मजबूत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसने तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Mamata Banergee, Siddramaiah, Uddhav Thackeray
Nagpur Metro : मेट्रो स्टेशनसाठी खर्च झाले ४१ कोटी, पण पार्किंगसाठीचा खर्च बघाल, तर बसेल धक्का !

दरम्यान, भाजप (BJP) सरकारच्या कार्यकाळात देशातील लोकशाही धोक्यात आल्याचा आरोप विरोधक करीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधकांना एकत्र करण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitishkumar) प्रयत्न करीत आहेत. यासाठी दिल्लीतील खर्गे यांच्या निवासस्थानी सर्व विरोधकांची बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर आता कर्नाटकच्या मुख्यमंत्री सोहळ्यानिमित्त काँग्रेसने समविचारी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण दिले आहे. यातून भाजपविरोधात विरोधकांची मोट मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Mamata Banergee, Siddramaiah, Uddhav Thackeray
Karad News : वीस हजारांची लाच घेताना कराड प्रांत कार्यालयातील दोन लिपिक जाळ्यात

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील भाजपशी मुकाबला करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. सध्या ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रमुख विरोधी नेत्यांची युती करण्याच्या मोहिमेवर आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भुवनेश्वरमध्ये नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. त्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी शिवसेनेचे (उबाठा)चे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

Mamata Banergee, Siddramaiah, Uddhav Thackeray
Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil: राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार ?

दरम्यान, कर्नाटकमधील विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, काँग्रेस मजबूत तेथे सर्व पक्षांनी काँग्रेसला पाठिंबा दिला पाहिजे. काँग्रेसनेही उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्ष, बिहारमधील 'आरजेडी'-'जेडीयू' आणि पश्चिम बंगालमधील 'टीएमसी'सारख्या प्रादेशिक पक्षांनाही पाठिंबा दिला पाहिजे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com