'हीच ती वेळ' म्हणत देशातील बड्या नेत्याचा राजकारणातून संन्यास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे.
Congress Leader A. K. Antony
Congress Leader A. K. AntonySarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय संरक्षणमंत्री ए. के. अँटनी (A. K. Antony) यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. यापुढे कोणतीही निवडणूक (Election) लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबाबत त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्राद्वारे कळवले आहे. त्यांचा मुक्काम आता दिल्लीतही राहणार नसून आपल्या गावी जाणार असल्याचे अँटनी यांनी स्पष्ट केलं आहे.

अँटनी हे मागील 52 वर्षांपासून राजकारणात आहेत. एवढी वर्ष राजकारणात असलेल्या देशातील काही मोजक्या नेत्यांपैकी त्यांचं नाव घेतलं जातं. काँग्रेसमधील अत्यंत विश्वासू नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यानी राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. अँटनी हे सध्या राज्यसभेचे (Rajya Sabha) खासदार असून त्यांची मुदत याचवर्षी एप्रिल महिन्यात संपत आहे. पण पुन्हा ही निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सोनिया गांधी यांना कळवले आहे.

Congress Leader A. K. Antony
फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बची वात भाजपनं दिल्लीतही पेटवली!

केरळची राजधानी तिरूवअनंतपुरम येथे माध्यमांशी बोलताना 81 वर्षांचे अँटनी यांनी सोनिया गांधींचे आभार मानत निवडणुकीच्या राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगितले. सोनिया गांधी यांनी आपल्या अनेकदा संधी दिल्याचे ते म्हणाले. राजकारणातून संन्यास घेण्याबाबत सोनिया गांधी यांना काही महिन्यांपूर्वीच माहिती दिली होती. संसदीय राजकारणाबाबत विचार केल्यानंतर त्यांच्याशी बोललो होतो. मागील महिन्यात केरळ काँग्रेसचे अध्यक्ष आणि इतर सहकाऱ्यांनीही सांगितले, असे अँटनी यांनी स्पष्ट केले.

आता माझी संसदीय राजकारणातील वाटचाल आणि राजकारण थांबवण्याची वेळ आली आहे. मी एप्रिल महिन्यात दिल्ली सोडणार असून तिरूवअनंतपुरम येथे राहणार असल्याचे अँटनी यांनी सांगितले. केरळमधील राज्यसभेच्या तीन जागांसाठी 31 मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यापैकी एक जागा अँटनी यांची आहे. पण या जागेवरून पुन्हा निवडणूक लढणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Congress Leader A. K. Antony
वाघमारेंनी फाईल पाठवली अन् सकाळी बदली झाली! गोटेंनी फडणवीसांची दोन प्रकरणं काढली बाहेर

केरळचे सर्वात तरूण मुख्यमंत्री अन् सर्वाधिक काळ संरक्षणमंत्री

अँटनी यांच्या राजकीय प्रवासाला 1970 मध्ये सुरूवात झाली. याचवर्षी ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून त्यांनी कधीच काँग्रेसची साथ सोडलेली नाही. त्यानंतर सात वर्षांतचे ते राज्याचे मुख्यमंत्री बनले. सलग पाच टर्म ते आमदार होते. तसेच केरळ काँग्रेसचे प्रमुख म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केलं. सर्वाधिक काळ संरक्षणमंत्री म्हणून काम पाहिल्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहेल. 2006 ते 2014 या कालावधीत ते मंत्री होते. राज्यसभेतही ते पाचवेळी निवडून गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com