ममतांनी वेडेपणा सुरू केलायं ; कॉग्रेसचा पलटवार, यूपीए त्यांना माहीत नाही का !

''मिले सुर मेरा-तुम्हारा तो सुर बने हमारा,''अशी परिस्थिती सध्या ममता आणि भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाठिंशी असल्याने ममता बॅनर्जींची ताकद आता वाढली आहे,''
adhir ranjan, chowdhury mamata banerjee
adhir ranjan, chowdhury mamata banerjeesarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : दोन दिवसाच्या मुंबईच्या दैाऱ्यावर असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी कॉग्रेसवर निशाणा साधला आहे. ''काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (UPA) अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल ममता बॅनजी यांनी उपस्थित केला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) यांनी त्यांना प्रत्युतर दिलं आहे.

अधीर रंजन चैाधरी म्हणाले, ''ममता बॅनर्जी (CM Mamta Banarjee) या आता जास्त वेडेपणानं वागत आहेत. त्यांना वाटतं आता संपूर्ण देश 'ममता-ममता' करीत आहेत. पण बंगाल म्हणजे ममता नाही, ममता म्हणजे बंगाल नाही, भाजप आणि ममता दीदी दोघांची एकजूट आहे. ''मिले सुर मेरा-तुम्हारा तो सुर बने हमारा,''अशी परिस्थिती सध्या ममता आणि भाजपची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाठिंशी असल्याने ममता बॅनर्जींची ताकद आता वाढली आहे,''

अधीर रंजन चैाधरी म्हणाले की, तृणमूल कॉग्रेसकडे इतका पैसा कुठून येत आहे. बंगालमधील जनतेची लुट करुन तृणमूल कॉग्रेस अन्य राज्यात पैशांची उधळपट्टी करीत आहेत. कॉग्रेसचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न तृणमूल कॉग्रेस करीत असून मोदींनी शक्तीशाली करीत आहेत. कॉग्रेस कमकुवत करण्याचा प्रयत्न यापूर्वी अनेक पक्षानी केला पण कॉग्रेस एक सतत वाहणारी नदी आहे त्यामुळे युपीए अखंड आहे.

ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे नाव घेऊन त्यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, कोणी काहीही करु शकत नाही. परदेशात राहत असतील तर कसं चालेल. यासाठी आम्हाला दुसऱ्या राज्यामध्ये जावे लागत आहे.

adhir ranjan, chowdhury mamata banerjee
देव करो अन् आपले ३०० खासदार निवडून येवोत ; गुलाम नबी आझादांचा घरचा आहेर

'’ममता बॅनर्जींना यूपीए म्हणजे काय हे माहित नाही का? मला वाटते की त्यांनी वेडेपणा सुरू केला आहे. पश्चिम बंगालमधील मागच्या निवडणुकांमध्ये त्यांनी वापरलेली युक्ती आता हळूहळू उघड होत आहेत,''असे चैाधरी म्हणाले.

''२०१२ मध्ये यूपीए सरकारमध्ये सहा टीएमसी मंत्री होते. ममता बॅनर्जींनी यूपीएला दिलेला पाठिंबा काढून घेण्यासाठी काही कारणे त्यावेळी सांगितली होती. त्यांना त्यावेळी यूपीए सरकार पाडायचे होते. पण त्या यशस्वी झाल्या नाही, कारण इतर पक्षांनी लगेच सरकारला पाठिंबा दिला,'' असे चौधरी म्हणाले.

पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी या स्वतःला मजबूत करीत आहेत. ममता बॅनर्जींचे हे जुने षड्यंत्र आहे. आपल्या सोबत अन्य पक्षाना सोबत घेऊन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com