Who is the new CM of Karnataka:
Who is the new CM of Karnataka:Sarkarnama

Decision Over Karnataka CM: कर्नाटक CM च्या घोषणेस उशीर का ? ; काँग्रेसने दिली भाजपची दोन उदाहरणे..

Jairam Ramesh Targets BJP : काँग्रेसने दोन सूत्र तयारी केली आहेत.
Published on

Jairam Ramesh Targets BJP : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार यांचा निर्णय काही तासातच होणार आहे, अशातच काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी टि्वट करीत भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्री पदाचे नाव जाहीर करण्यास उशीर का होत आहे, याचे कारण जयराम रमेश यांनी सांगितले आहे. यासाठी त्यांनी भाजपला आसाम आणि उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्री निवडीचे उदाहरण देत निशाणा साधला आहे.

२०१७ मध्येउत्तरप्रदेश विधानसभेचा निकाल ११ मार्च रोजी जाहीर झाला होता पण योगी आदित्यनाथ यांच्या नावाची घोषणा आठ दिवसानंतर म्हणजे १९ मार्च रोजी करण्यात आली होती. २०२१ मध्ये आसामच्या निवडणुकीचा निकाल ३ मे रोजी लागला होता त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून हिमंत बिस्वा सरमा यांच्या नावाची घोषणा सात दिवसानंतर म्हणजे १० मे रोजी करण्यात आली होती, ही उदाहरणे जयराम रमेश यांनी दिली आहेत.

Who is the new CM of Karnataka:
Karnataka CM Announcement : अखेर निर्णय झाला ; मुख्यमंत्री सिद्धरामय्या तर शिवकुमार यांच्या गळ्यात उपमुख्यमंत्री पदाची माळ ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार, यावर गेल्या चार दिवसापासून चर्चा सुरु आहे. सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याचे समजते, याची घोषणा राहुल गांधी लवकरच करणार आहेत.

चार दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या. मुख्यमंत्रीपदासाठी डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या हे शर्यतीत होते. याबाबतचा निर्णय घेण्याची जबाबदारी पक्षश्रेष्ठींनी मल्लिकार्जून खर्गे यांच्यावर सोपवली होती. त्यानंतर दोन दिवसापूर्वी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. पण अद्याप डी.के.शिवकुमार आणि राहुल गांधी यांची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावर ते अजूनही ठाम असल्याचे समजते.

काँग्रेसने दोन सूत्र तयार केली आहेत. त्यातील एक मान्य होण्याची शक्यता आहे.

  1. सिद्धरमय्या पहिले अडीच वर्षे मुख्यमंत्री राहातील. उर्वरित अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद डीके शिवकुमार यांना दिले जाईल. मात्र यावर दोन्ही नेत्यांचे एकमत होऊ शकले नाही.

  2. सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद आणि डीके शिवकुमार यांना प्रदेशाध्यक्षपदासह दोन महत्त्वाचे मंत्रालय देण्याचा दुसरा प्रस्ताव देण्यात आला. यावर अद्याप दोन्ही नेत्यांनी आपले मत व्यक्त केलेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com