विराट कोहलीच्या राजीनाम्यास शहांच राजकारण जबाबदार?

भारतीय क्रिकेटर (Indian Cricket) फलंदाज विराट कोहलीने (Vitrat Kohli) आपल्या कसोटी प्रकारातील कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.
Jay Shah & Virat Kohli
Jay Shah & Virat KohliSarkarnama
Published on
Updated on

पुणे : भारतीय क्रिकेटर (Indian cricketer) व टीमचा कसोटी प्रकारातला कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्या या तडकाफडकी घेतलेल्या निर्णयावर बहुतांश क्रिकेटपटू आणि क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्य व्यक्त करत आहेत. मात्र, यावरून आता चांगलेच राजकारण रंगतांना दिसत असून काँग्रेसकडून (Congress) बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शहा (Jay Shah) यांच्यावर निशाणा साधला जात आहे. क्रिकेट (Cricket) बोर्डातील ‘शाहजाद्यांचं’ राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय, अशा खोचक शब्दात काँग्रेस नेते व राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी बीसीसीआयच्या कारभारावर जोरदार टीका केली आहे.

Jay Shah & Virat Kohli
सीबीआयच्या छाप्यांनी पुन्हा खळबळ; केंद्राच्या गॅस अॅथॉरिटीचे संचालक अटकेत

राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, "भारताच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार विराट कोहली जेव्हा राजीनामा देतो तेव्हा समजावं की क्रिकेट बोर्डातील “शाहजाद्यांचं” राजकारण फार घाण पातळीवर उतरलंय. मोहम्मद शमीच्या पाठीशी विराट पहाडासारखा उभा राहिला होता," असे ट्विट करत राऊतांनी देशाचे गृहमंत्री यांच्या सुपूत्र जय शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

कोहलीच्या या निर्णयावरून भारताच्या मर्यादित षटकांच्या टीमचा कर्णधार रोहित शर्मानेही याविषयी आश्चर्य व्यक्त केले असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एका दिवसानंतर कोहलीचे अभिनंदन केले आहे. कोहलीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयचे अभिनंदन केले असून बोर्ड आणि निवड समिती त्यांच्या निर्णयाचा आदर करत असल्याचे म्हटले आहे. याशिवाय बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी विराट कोहलीबाबतही निवेदन दिले असून त्यात अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ व संयुक्त सचिव यांच्या नावाचा समावेश आहे.

Jay Shah & Virat Kohli
साडेतेरा लाखांची बाईक विझवणार पिंपरीतील आग...

बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, बोर्डाला विश्वास आहे की विराट भारतीय क्रिकेटला अधिक उंचीवर नेण्यासाठी खेळाडू म्हणून आपले सर्वोत्तम कार्य करत राहतील. कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. एमएस धोनीनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराटने ६८ कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले, त्यापैकी ४० सामने भारताने जिंकले आहे. कर्णधार म्हणून भारताने २०१५ मध्ये श्रीलंकेत कसोटी मालिका जिंकली होती. २२ वर्षात प्रथमच भारताने हा पराक्रम केला होता. नुकतीच दक्षिण आफ्रिकेसोबत झालेल्या 3 कसोटी सामन्याच्या कसोटी मालिकेत भारताला 2-1 या फरकाने पराभव पत्कारावा लागला आहे. विराटने काही महिन्यापुर्वी टी-20 प्रकारातील आपल्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्याचे वनडेतील कर्णधारपद काढण्यात आले होते. यानंतरही मोठा वाद निर्माण झाला होता.

दरम्यान, राऊत यांनी भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे पुत्र जय शहांवर केलेल्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com