Congress : काँग्रेसच्या बड्या नेत्याला विमानातून उतरवले..; विमानतळावर BJP विरोधात घोषणा ; अटक होणार ?

Congress Convention Raipur News : दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर आता सीआईएसएफचे जवानांना बंदोबस्त वाढविला आहे.
Congress Convention Raipur News
Congress Convention Raipur News Sarkarnama

Congress Convention Raipur News : काँग्रेसचे उद्यापासून (ता.२४) रायपूर येथे अधिवेशन होत आहे, यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते हे रायपूरकडे रवाना होत आहेत. या दरम्यान एक मोठी अपडेट समोर येत आहे.

काँग्रेसचे नेते पवन खेरा यांना आज (गुरुवारी) दिल्ली येथे विमानातून उतरविण्यात आले. यावेळी विमानतळावर गोंधळ झाला. ते इंडिगो (6E-204)विमानात बसले होते.

पवन खेरा हे रायपूर येथे अधिवेशनासाठी जात होते. विमानाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना खाली उतरवले. यावेळी विमानात उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली.

पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल असल्याने ते विमान प्रवास करु शकत नाही, असे 'इंडिगो'च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पवन खेरांना विमानातून खाली उतरवल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्या ठिकाणी काही काळ आंदोलन केलं.

काँग्रेस आणि भाजप नेत्यामध्ये एकमेंकाविरोधात सुरु असलेल्या घोषणाबाजीनंतर आता परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. दिल्ली पोलिसांनी पवन खेरा यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर आता सीआईएसएफचे जवानांना बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसउपायुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

Congress Convention Raipur News
Delhi MCD Election: भाजप-आप नगरसेवकांमध्ये राडा ; बाटल्या फेकल्या ; महापौरांवर हल्ला..; व्हिडिओ व्हायरल

पवन खेरा यांना अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. "पवन खेरा यांच्याबाबत केलेली कारवाई ही हुकूमशाही आहे," असे टि्वट काँग्रेसने केले आहे. लखनऊ महानगर भाजपचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी 20 फेब्रुवारी रोजी पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काय म्हणाले होते पवन खेरा

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणावर काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला होता. पवन खेरा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चुकीचे नाव घेताना दिसून आले. पवन खेरा म्हणाले की, आम्ही फक्त अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याची मागणी करत आहोत. नरसिंह राव जेपीसी स्थापन करू शकले असते, अटलबिहारी वाजपेयी जेपीसी स्थापन करू शकले असते, मग नरेंद्र गौतम दास मोदींना काय हरकत आहे, असे ते म्हणाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चुकीचे नाव घेतल्यानंतर त्यांनी माफी मागितली. यानंतर ते म्हणाले की, नाव दामोदर दास असेल, पण काम गौतम दासांचे आहे. या विधानानंतर पवन खेरा यांनी ट्विट केले. त्यात ते म्हणाले की, मी खरोखरच संभ्रमात पडलो आहे. हे दामोदरदास आहेत की गौतम दास.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com