भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरूद्ध तक्रार अन् राहुल गांधी आरोपी

भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi

बंगळूर : कर्नाटकातील (Karnataka) जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा गाजू लागला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) दाखल केलेल्या तक्रारीत थेट काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधींनाच (Rahul Gandhi) आरोपी करण्यात आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. भाजप (BJP) नेते व माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार (D.K.Shivakumar) हेसुद्धा यात आरोपी आहेत.

सिंचन प्रकल्पांची कंत्राटे देताना कमिशन घेतल्याचा गंभीर आरोप एका उद्योगपतीने केला आहे. उद्योगपती आलम पाशा यांनी लाललुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.त्यांनी एसीबीच्या महासंचालकांना भेटून ही तक्रार केली आहे. यात तक्रारीत राहुल गांधी, येडियुरप्पा आणि शिवकुमार यांच्यासह 13 जणांची नावे आहेत. पाशा हे माहिती अधिकार कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या या तक्रारीमुळे पुन्हा एकदा कर्नाटकातले राजकारण तापले आहे.

या तक्रारीत येडियुरप्पा आणि शिवकुमार हे क्रमांक एक आणि दोनचे आरोपी आहेत. यानंतर येडियुरप्पांचे स्वीय सहाय्यक एम.आर.उमेश, काँग्रेस नेते उग्रप्पा, सलीम हे आरोपी आहेत. यात 13 क्रमांकाचे आरोपी हे राहुल गांधी आहेत. याबद्दल बोलताना पाशा म्हणाले की, माझ्या तक्रारीत राहुल गांधी हे 13 क्रमांकाचे आरोपी आहेत. कारण, शिवकुमार हे आधी जलसंपदा मंत्री होते. ते कंत्राटदारांकडून 12 टक्के कमिशन घेतात, याची त्यांनी माहिती होती. असे असतानाही राहुल गांधींनी 2020 मध्ये त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. त्यांनी एक प्रकारे भ्रष्टाचाराला खतपाणी घातले आहे.

येडियुरप्पा आणि शिवकुमार यांनी सिंचन प्रकल्पांची कंत्राटे वाटताना पैसे घेतले, असा आरोप करण्यात येत आहे. काँग्रेस नेते व्ही.एस.उग्रप्पा आणि काँग्रेसचे माध्यम सल्लागार एम.ए.सलीम यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावेळी या भ्रष्टाचाराची माहिती सर्वांसमोर आली होती. याबाबत पाशा म्हणाले की, आधी येडियुरप्पांचे सरकार असताना 8 टक्के लाच घेतली जात होती. डी.के.शिवकुमार हे 2018 मध्ये जलसंपदा मंत्री असताना ती 12 टक्क्यांनर गेली. त्यामुळे ते दोघेही आरोपी क्रमांक 1 आणि 2 आहेत.

Rahul Gandhi
पंजाबमधील वाद टोकाला! कॅप्टन विरुद्ध आता सिद्धूंची पत्नी मैदानात

डी. के. शिवकुमार हे पहिल्यांदाच वादात अडकले नाहीत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी एका कार्यकर्त्याच्या थोबाडीत मारली होती. याबाबतचा व्हिडीओही समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हा कार्यकर्ता शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तसेच, शिवकुमार यांच्याविषयी पक्षातील अन्य काही नेत्यांच्याही तक्रारी आहेत.

Rahul Gandhi
कर्नाटकात राजकीय बॉम्ब : भाजपच्या येडियुरप्पांसह काँग्रेसचे शिवकुमारही अडचणीत

येडियुरप्पांच्या रुपाने दक्षिणेत भाजपचा पहिला मुख्यमंत्री झाला होता. येडियुरप्पांची मुख्यमंत्रिपदाची ही चौथी टर्म होती. त्यांच्या चौथ्या टर्ममधील मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात येडियुरप्पांनी राजीनाम्याची घोषणा केली होती. त्यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी बोम्मई यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. येडियुरप्पा यांच्या संमतीनेच त्यांची निवड झाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com