Rahul Gandhi : राहुल गांधींनी ‘तो’ वटहुकूम फाडला नसता तर आज त्यांची खासदारकी वाचली असती...

Congress Party News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल टीका करणं राहुल गांधींना महागात पडलं.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama

Rahul Gandhi News Updates : देशाचे तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना मानहाणीकारकपणे २०१३ साली वटहुकूम परत घ्यावा लागला. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भर पत्रकार परिषदेत आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांनी काढलेला वटहुकूम फाडला होता.

या वटहुकूमाला गांधी यांनी कडाडून विरोध केल्याने मनमोहन सिंग यांना हा वटहुकूम परत घ्यावा लागला होता. तो वटहुकूम परत घेतला नसता तर आज राहुल गांधींना या कायद्याची मदत झाली असती. त्यांची खासदारकी वाचली असती. राजकारणातील या योगायोगाची चर्चा लोकसभा सचिवालयाच्या आज निर्णयानंतर आज सुरू झाली.

Rahul Gandhi
Rahul Gandhi यांची खासदारकी रद्द झाली ; याआधी लालू प्रसाद यादव, जयललितांसह भाजप नेत्यांवर आली होती ही वेळ

दोषी ठरलेल्या खासदार-आमदारांना तातडीच्या अपात्रतेपासून अभय देणाऱ्या वटहुकुमाची प्रत फाडून तीव्र विरोध करण्याचा निर्णय राहुल गांधींच्या बडतर्फीचे प्रमुख कारण ठरण्याची शक्यता आहे.

शिक्षा झाल्यामुळे राहुल गांधी अपात्र ठरले असून हा माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काव्यगत न्याय मिळाल्याची चर्चा गुरुवारी राजकीय वर्तुळात रंगली होती.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधींचा विषय निघताच का भडकले एकनाथ खडसे व शशिकांत शिंदे ?

दरम्यान, राहुल गांधी यांच्या तत्कालीन निर्णयामुळे आता त्यांच्या लोकसभेच्या सदस्यत्वावर गदा येण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत टीका करणं राहुल गांधींना चांगलंच महागात पडलं आहे. गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यामुळे काँग्रेस चांगलच आक्रमक झालं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com