BJP Vs Congress : राजकारण तापलं; गुंडांचा समावेश असलेली भाजपची संभाव्य उमेदवारी यादी काँग्रेसने केली ‘लिक’

निवडणुकीच्या वेळी हेच मुद्दे पुढे करून भाजपचा काटा काढण्याचा काँग्रेसचाही प्रयत्न आहे.
BJP-Congress
BJP-CongressSarkarnama

बंगळूर : कर्नाटक (Karanataka) विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) जसजशा जवळ येत आहेत, तसतशी रणनीतीला वेग येऊन आरोप-प्रत्यारोप वाढत आहेत. कर्नाटकात सध्या सुरू असलेल्या गुंडांच्या राजकीय वादाकडे लक्ष वेधले जात असतानाच, भाजपला (BJP) टक्कर देण्यासाठी काँग्रेसने (Congress) भाजप उमेदवारांची संभाव्य यादी ‘लिक’ करून वेगळीच मोहीम हाती घेतली आहे. (Congress 'leaks' BJP's list of Karnataka assembly candidates including gangsters)

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून पक्षप्रवेश जोरात करून घेतले जात आहेत. त्यात कोणतीही चाळणी न लावता सरसकट सर्वांनी प्रवेश दिले जात आहेत. भाजपकडून गुंड, दंगलखोर आणि समाज कंटकांना पावन करून घेतले जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. त्याच संभाव्य उमेदवारांची यादी काँग्रेसने https://www.bjprowdymorcha.com या वेबसाइटवर ‘लिक’ केली आहे.

BJP-Congress
Bhagat Singh Koshyari : कोश्यारी भाजपलाही नकोसे झालेत : राज्यपालांना हटविण्यामागे ‘हा’ आहे डाव

काँग्रेसने दावा केला आहे, की ही मोहीम भाजपच्या उद्धट राजकारणाचा पर्दाफाश करण्यासाठी आहे. भाजप हा दंगलखोर आणि समाजकंटकांचे आश्रयस्थान बनला आहे. रोज नवनवीन लोक पक्षात सामील होत आहेत. वेबसाइटवर बंगळूरच्या गुंडांना उमेदवारी देऊन भाजप राजकारणाचे गुन्हेगारीकरण कसे करत आहे, याचा तपशील आहे. भाजपचे बहुतेक उमेदवार दंगलखोर व गुंड प्रवृत्तीचे आहेत, असाही आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

BJP-Congress
Basavraj Bommai : सोलापुरात कन्नड भवनसाठी १० कोटी; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा काढली महाराष्ट्राची खोड

काँग्रेसने जाहीर केलेल्या भाजप उमेदवारांच्या यादीत विल्सन गॉर्डन नाग, बेटनागेरे शंकर, गुंड उप्पी आदींच्या नावांचा त्यात समावेश आहे. भाजप खासदार तेजस्वी सूर्या, पी. सी. मोहन, आमदार उदय गरुडाचर यांनी बंगळूर शहरातील चामराजपेठ येथे गुंड शीटर, सायलेंट सुनील यांच्यासोबत व्यासपीठावर दिसून आले आहेत. यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यापाठोपाठ नगरपालिकेतील रामनगर येथील गुंड मंजुनाथ एस. लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. भाजप कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात रवी नावाचा गुन्हेगारी वृत्तीचा व्यक्ती पक्षात दाखल झाली.

BJP-Congress
Solapur विमानसेवा-‘सिद्धेश्वर’ची चिमणी वादात सुशीलकुमार शिंदेंची उडी : म्हणाले, ‘हे फुजूल आहे सगळं...’

सायलेंट सुनील, फायटर रवी, विल्सन गॉर्डन नागा, मंजुनाथ एन ऊर्फ ​​कुट्टी आदी नावे काँग्रेसकडून वारंवार घेतली जात आहेत. निवडणुकीच्या वेळी हेच मुद्दे पुढे करून भाजपचा काटा काढण्याचा काँग्रेसचाही प्रयत्न आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com