राजकारण तापलं! भाजपच्या आयारामाला पुढं करून काँग्रेस टाकणार मुख्यमंत्र्यांवर डाव

निवडणूक ठरवणार मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार
Congress-BJP News
Congress-BJP NewsSarkarnama
Published on
Updated on

आगरतळा : त्रिपुराचे (Tripura) मुख्यमंत्री डॉ.माणिक साहा (Manik Saha) यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधी राज्यात होत असलेल्या चार विधानसभा पोटनिवडणुका म्हणजे मिनी विधानसभा ठरणार आहेत. यात साहांना स्वत:सोबत भाजपच्या (BJP) उमेदवारांनी विजयी करून नेतृत्वाची कसोटी पार करावी लागणार आहे. याचवेळी भाजप सोडून आलेल्या आमदाराला मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरवण्याचा डाव काँग्रेस टाकणार आहे.

त्रिपुरात चार विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका होत आहेत. भाजपच्या तीन आमदारांनी राजीनामा देऊन पक्ष सोडल्यामुळं आणि डाव्या पक्षाच्या एका आमदाराच्या निधनामुळं या पोटनिवडणुका होत आहेत. यामुळं राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. यातील टाऊन बोरडोवली मतदारसंघातून साहा हे मैदानात उतरले आहेत. भाजपने आजच त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली. साहा यांच्यासमोर काँग्रेेसनं आशिषकुमार साहा यांना मैदानात उतरवण्याची तयारी केली आहे. माणिक साहा आणि आशिषकुमार साहा हे अनेक दशकांपासून चांगले मित्र आहेत. त्यांनी वेळोवेळी पक्ष बदलले तरी त्यांची मैत्री कायम राहिली आहे. आता दोघेही मित्र आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

Congress-BJP News
पत्नीनं रंगेहाथ पकडताच काँग्रेसच्या बड्या नेत्याची राजकारणातून विश्रांती

माणिक साहा यांची राजकीय कारकिर्द सुमारे तीन दशकांची आहे. त्यांनी अद्यापपर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही. आता ते पहिल्यांदाच निवडणूक लढत आहेत. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत असल्याने भाजपने या पोटनिवडणुका प्रतिष्ठेच्या केल्या आहेत. साहा हे राज्यसभा सदस्य आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. आता त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आलं आहे. या पदावर कायम राहण्यासाठी त्यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाणं आवश्यक आहे. त्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ते मैदानात उतरले आहेत. याचबरोबर या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीवर ते आगामी काळात मुख्यमंत्री राहणार की नाही, याचाही निर्णय होणार आहे.

Congress-BJP News
केंद्रीय मंत्रिमंडळातून नक्वींना डच्चू? एकमेव मुस्लिम चेहराही 'आऊट' होण्याची चिन्हे

खासदार डाॅ. साहा यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करुन भाजपने धक्कातंत्र वापरलं होतं. डाॅ. साहा मागील विधानसभा निवडणुकीआधी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले होते. ते मागील एप्रिल महिन्यात राज्यसभा खासदार बनले. यानंतर महिनाभरातच भाजप नेतृत्वाने त्यांची त्रिपुरात मुख्यमंत्री म्हणून निवड करण्याची खेळी खेळली. कर्नाटक, उत्तराखंड, गुजरातप्रमाणे भाजपने त्रिपुरात रणनीती आखली. यानंतर केवळ दोघांचा अपवाद वगळता इतर सर्व मंत्रिमंडळ कायम ठेवण्यात आलं होतं. त्रिपुरात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होत आहे. निवडणुकीला सुमारे वर्षभराचा कालावधी असतानाच मुख्यमंत्रिपदावरून देव यांना हटवण्यात आलं. राज्यातील भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्यानं पक्ष नेतृत्वानं हे पाऊल उचललं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com