Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्यांचा शिवसेनेत प्रवेश

Rajendra Singh Gudha News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी राजस्थानच्या दौऱ्यावर होते.
Eknath Shinde News
Eknath Shinde NewsSarkarnama
Published on
Updated on

Rajasthan politics : राजस्थानमधील माजी मंत्री आणि लाल डायरीमुळे विशेष चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी बुधवारी झुनझुन जिल्ह्यात पार पडलेल्या कार्यक्रमात आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे यांनी राजस्थानमध्येही पहिला आमदार आपल्या गळाला लावला आहे.

या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे (Shivsena) राजस्थान राज्यप्रमुख लाखनसिंह पवार, ओमसिंह चारण, श्यामप्रताप सिंह, प्रतापसिंह चौहान आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे म्हणाले, महाराष्ट्र ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, तर राजस्थान ही महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांचे एकमेकांशी शूरतेचे नाते असल्याचे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.

Eknath Shinde News
MLA disqualification case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट ; १४ सप्टेंबरला विधानसभा अध्यक्षांकडे होणार सुनावणी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचे शिलेदार ३२ राज्यांमध्ये काम करत असून, गुढा यांच्या प्रवेशामुळे राजस्थान राज्यातील शिवसेनेला अधिक बळकटी मिळेल, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राजेंद्र सिंह गुढा हे कायम सत्यासाठी लढत आले असून, सत्तेसाठी कधीच लढले नाहीत.

सत्यासाठी त्यांनी सत्तेला लाथ मारली. मीदेखील माझ्या ४० आमदारांच्या साथीने वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेण्यासाठी सत्तेवर लाथ मारून बाहेर पडलो हे आमच्यात साम्य असल्याचे मत या वेळी बोलताना व्यक्त केले. या प्रसंगी राजस्थान येथील रुग्णांच्या सेवेकरता शिवसेनेच्या वतीने ५ रुग्णवाहिका प्रदान करण्यात आल्या.

Eknath Shinde News
Pankaja Munde Shiv Shakti Parikrama : पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय?; ‘राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही, पण ‘वेट ॲण्ड वॉच...’

राजेंद्र सिंह गुढा यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात लोक जनशक्ती पक्षातून झाली. यानंतर २००८ मध्ये राजेंद्र सिंह गुढा यांनी बसपकडून निवडणूक लढवली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राजेंद्र गुढा यांनी २०१३ ची निवडणूक काँग्रेसच्या (Congress) तिकिटावर लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. २०१८ मध्ये गुडा यांनी काँग्रेस सोडली आणि पुन्हा बसपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर परत त्यांनी बसप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता गेल्या वर्षभरापासून ते काँग्रेसपासून अंतर राखून होते. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com