MLA disqualification case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात मोठी अपडेट ; १४ सप्टेंबरला विधानसभा अध्यक्षांकडे होणार सुनावणी

Shiv Sena MLA disqualification News : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे.
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde newsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena News : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्व आमदारांना नोटीस बजावत आपले म्हणणे मांडण्याची सूचना केली होती. विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास केल्यानंतर आता या प्रकरणात प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात १४ सप्टेंबरला ही सुनावणी घेण्यात येणार आहे.

एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. तब्बल ३४ याचिकांवर विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत. शिवसेनेचे ५४ आमदार या सुनावणीसाठी एकाच छताखाली येणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले सगळे आमदार आहेत. तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत असलेल्या आमदारांचीही सुनावणी होणार आहे. वादी व प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे. संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावले जाणार आहे.

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
Pankaja Munde Shiv Shakti Parikrama : पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय?; ‘राज्याच्या राजकारणात सक्रिय नाही, पण ‘वेट ॲण्ड वॉच...’

विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणी वेळी आमदाराना आपले म्हणणे मांडायला संधी मिळणार आहे. त्यानंतर आमदार आपले पुरावे सादर करतील तसेच एकमेकांना पुराव्याचे पेपर देतील, अशी माहिती मिळत आहे. विधिमंडळातील सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर प्रत्येक याचिकेचे वेगळे इशू फ्रेम केले जाणार आहेत.

Uddhav Thackeray, Rahul Narwekar, Eknath Shinde news
MP Sanjay Raut On G-20 Summit : मोदींनी केलं त्यात नवल काय ? नेहरू, इंदिरा गांधींनी अशा बैठका घेतल्या आहेत..

विधानभवनात 14 सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार आहे. प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे. दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर नऊ महिने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) मोठी सुनावणी पार पडली. त्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे दिले गेले. त्यामुळे अध्यक्ष काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com