गुवाहाटी : गुजरातमधील (Gujrat) काँग्रेसचे (Congress) आमदार जिग्नेश मेवानी (jignesh Mevani) यांना न्यायालयानं आज दिलासा दिला आहे. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पोलिसांशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात आसाम पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, आसाममधील आणखी एका गुन्ह्यात त्यांना आधीच जामीन मिळाल्याने अखेर मेवानींच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. यानंतर मेवानी यांनी भाजपवर (BJP) गंभीर आरोप केले आहेत. (Jignesh Mevani News Updates)
भाजपने मला अडकवण्यासाठी महिलेचा वापर केल्याचा दावा मेवानी यांनी केला आहे. हा भाजप सरकारचा भ्याडपणा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. आसाममध्ये भाजपची सत्ता आहे. दरम्यान, मेवानी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यात न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर लगेचच आसाम पोलिसांनी त्यांना दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली होती. महिला पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन केल्याप्रकरणी हा दुसरा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला होता. या प्रकरणी अखेर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. जामीन मंजूर झाला असला तरी मेवानी यांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन सुटकेसाठी उद्यापर्यंत (ता.30) प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वडगावमधील पालनपूर सर्किट हाऊसमध्ये मेवानी यांना 21 एप्रिलला आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्या रात्रीच त्यांना अहमदाबादमध्ये नेण्यात आले होते. तिथून रेल्वेने त्यांना आसाममध्ये गुवाहाटीला नेण्यात आले होते. आसाममधील कोक्राझार येथील स्थानिक भाजप (BJP) नेत्यानं मेवानी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. धार्मिक भावना दुखावना, धार्मिक तेढ निर्माण करणे, असे आरोप मेवानी यांच्यावर करण्यात आले होते. आसाममध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासांतच मेवानी यांना अटक झाली होती. गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा काँग्रेसनं केला होता.
आसाम पोलिसांनी अटक केल्यानंतर मेवानी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, हा तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कट होता. माझी प्रतिमा मलिन करण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे. ते पद्धतशीरपणे यासाठी पावले उचलत आहेत. आधी त्यांनी रोहित वेमुलाच्या बाबतीत हेच केलं होतं. नंतर चंद्रशेखर आझाद आणि माझ्याबाबतही हेच घडतं आहे. पंतप्रधान कार्यालयातून सुडाचं राजकारण सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.