MLA Sukhpal Khaira Arrest : ड्रग्ज प्रकरणात काँग्रेसचा आमदार अडकला; पंजाब पोलिसांची मोठी कारवाई

Congress Leader Detained By Police: पंजाबमधील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांना ड्रग्ज प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली
MLA Sukhpal Khaira
MLA Sukhpal KhairaSarkarnama
Published on
Updated on

Punjab News: पंजाबमधील काँग्रेसचे आमदार सुखपाल सिंग खैरा यांना ड्रग्ज प्रकरणात पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी पहाटे सुखपाल सिंग खैरा यांना चंडीगडमधील त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले. काँग्रेसच्या आमदारावर कारवाई करण्यात आल्याने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी या कारवाई प्रकरणी पंजाबमधील 'आप' सरकारवर मनमानी केल्याचा आरोप केला आहे. तसेच राजकीय हिशोब चुकता करण्यासाठी आपल्यावर ही कारवाई करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

MLA Sukhpal Khaira
Ganesh Visarjan 2023 : राजकीय नेत्यांच्या कमानी बाप्पांच्या मार्गात ठरताहेत 'विघ्न'; मनसेकडून व्हिडिओ व्हायरल

सुखपाल सिंग खैरा हे पंजाबमधील भुलत्थ विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. तर 2021 मध्ये आम आदमी पक्षातून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता सुखपाल सिंग खैरा यांना ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईवरूनच सुखपाल सिंग खैरा यांनी पंजाबमधील 'आप' सरकारवर गंभीर आरोप केल्यामुळे काँग्रेस आणि 'आप' आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

एकीकडे 'इंडिया आघाडी'च्या माध्यमातून काँग्रेस, आम आदमी पक्षासह जवळपास 28 पक्ष एकत्र आले आहेत. दुसरीकडे मात्र, काँग्रेसच्या आमदारावर पंजाबमधील 'आप' सरकारने कारवाई केल्याने याचा फटका आघाडीला बसणार तर नाही ना? असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Edited By- Ganesh Thombare

MLA Sukhpal Khaira
MP Ramesh Bidhuri News: रमेश बिधुडींना लोकसभेतील वादग्रस्त वक्तव्य भोवणार ? विशेषाधिकार समिती करणार चौकशी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com