Congress's Questions to BJP : नऊ वर्षांच्या भाजप सरकारला काँग्रेसचे नऊ प्रश्न; पंतप्रधान मोदींवर निशाणा

PM Narendra Modi : नव्या संसदेच्या प्रश्नानंतर काँग्रेसने पुन्हा भाजपला डिवचलं
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Congress Ask Nine Question to BJP : नवीन संसद भवनाच्या उदघाटानावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, देशात भाजपचे सरकार स्थापन होऊन नऊ वर्षे पूर्ण होत आहे. त्यावर काँग्रेसने पुन्हा भाजपला डिवचले आहे. सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत असून काँग्रेसने भाजपला नऊ प्रश्न केले आहेत. याबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वारंवार काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही प्रश्न सरकारला विचारले आहेत. सरकारकडून मात्र त्यातील एकाचेही उत्तर दिले नसल्याचा आरोप रमेश यांनी केला आहे.

Rahul Gandhi, Narendra Modi
Parliament building News : मल्लिकार्जुन खर्गे अन् अरविंद केजरीवालांना राष्ट्रपतींबद्दल केलेले वक्तव्य भोवणार; काय आहे प्रकरण?

जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सरकारचे नऊ वर्षे, तर काँग्रेसचे नऊ प्रश्न, उत्तर मात्र शून्य. असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यानंतर त्यांनी नऊ प्रश्नांची यादीच पोस्ट केली आहे. त्या यादीत शेतकरी, अर्थव्यवस्था, भ्रष्टाचारासह सीमासुरक्षेबाबतच्या प्रश्नांचा समावेश आहे. ती यादी खालील प्रमाणे-

1. अर्थव्यवस्था : भारतात महागाई आणि बेरोजगारी गगनाला का भिडते ? श्रीमंत अधिक श्रीमंत आणि गरीब अधिक गरीब का झाले? आर्थिक विषमता वाढत असतानाही सार्वजनिक मालमत्ता पंतप्रधान मोदी (Narendra Modi) यांच्या मित्रांना का विकली जात आहे?

2. शेती आणि शेतकरी : गेल्या नऊ वर्षांत शेतकऱ्यांचे (Farmers) उत्पन्न दुप्पट का झाले नाही? तीन काळे कृषी कायदे रद्द करताना शेतकऱ्यांशी केलेल्या करारांचा आदर का केला नाही? हमीभावाबाबत कायदेशीर हमी का दिली नाही?

Rahul Gandhi, Narendra Modi
Baramati News : पळशीच्या माजी सरपंचांची बातच न्यारी : वयाच्या ४० व्या वर्षी परीक्षा देत बारावीत पटकावला प्रथम क्रमांक

3. भ्रष्टाचार आणि कुरघोडी : तुमचा मित्र अदानी (Adani) यांच्या फायद्यासाठी 'एलआयसी 'आणि 'एसबीआय'मधील लोकांच्या बचतीला धोका का देत आहात? चोरांना का पळू देत आहात? भाजपशासित राज्यांतील भ्रष्टाचारावर गप्प का आहात?

4. चीन आणि राष्ट्रीय सुरक्षा : चीनसोबत (China) 18 बैठका झाल्या, तरीही त्यांनी भारतीय भूभाग सोडण्यास नकार का दिला? पंतप्रधानांनी 2020 मध्ये चीनला क्लीन चिट देऊनही चीनने भारताच्या भूमीवर ठाण का मांडले आहे?

5. सामाजिक समरसता : तुम्ही निवडणुकीसाठी जाणूनबुजून द्वेषाचे राजकारण का करत आहात? समाजात भीतीचे वातावरण का निर्माण होते?

6. सामाजिक न्याय : तुमचे अत्याचारी सरकार सामाजिक न्यायाचा पाया पद्धतशीरपणे का नष्ट करत आहे? तुम्ही महिला, दलित, एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांकडे का दुर्लक्ष करत आहात? अत्याचारावर गप्प का? जात जनगणना का होत नाही?

7. लोकशाही आणि संघराज्य : गेल्या नऊ वर्षांत तुम्ही घटनात्मक मूल्ये आणि लोकशाही संस्था कमकुवत का केल्या? Opposition विरोधी पक्ष आणि नेत्यांवर सूडाचे राजकारण का करता? जनतेने निवडून दिलेली सरकारे अस्थिर करण्यासाठी तुम्ही उघड पैशाचा वापर का करता?

8. कल्याणकारी योजना : अर्थसंकल्पात कपात करून मनरेगासारख्या लोककल्याणकारी योजना कमकुवत का झाल्या? गरीब, आदिवासी, गरजूंच्या स्वप्नांचा चुराडा का होत आहे?

9. कोविड-19 गैरव्यवस्थापन : कोविड-19 मुळे 40 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मोदी सरकारने (BJP Government) त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्यास का नकार दिला? तुम्ही अचानक लॉकडाऊन का लादला? त्यामुळे प्रभावित झालेल्या लोकांना आधार का दिला नाही?

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com