नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी (congress president)अर्ज भरण्यासाठी शुक्रवार शेवटचा दिवस आहे. राजस्थान काँग्रेसमधील नेतृत्वावरुन सत्तानाट्य रंगत असतानाच काँग्रेसमध्ये बऱ्याच दिवसांनी गुरुवारी मध्यरात्री राजकीय खलबते झाली. त्यामध्ये काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधीही बऱ्याच दिवसांनी सामील झाल्या होत्या. (congress president latest news)
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाहीत, हेही स्पष्ट झाले आहे. दिग्विजयसिंह आणि शशी थरूर यांची नावे लढतीसाठी गुरुवारपर्यंत समोर आली. शुक्रवारी दोन्ही नेते अर्ज दाखल करतील.अशोक गहलोत यांचे नाव वगळल्यानंतर दिग्विजय सिंह आणि शशी थरूर हे काँग्रेस अध्यक्षपदाच्या दावेदारांमध्ये होते. मात्र गुरुवारी झालेल्या G-23 च्या बैठकीनंतर तिसरा उमेदवार येण्याची शक्यता बळावली आहे.
कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काही विचारण्याआधीच अशोक गेहलोत यांनी २५ सप्टेंबरच्या घटनेबाबत माफी मागितली आहे. काँग्रेस-गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ राहिलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले,‘मी अध्यक्षपदाची निवडणूक लढणार नाही. मुख्यमंत्री राहणार की नाही, हे सध्या माहीत नाही. दोन दिवसांपूर्वी जयपूरमध्ये जे झाले त्याने सर्व जण स्तब्ध झाले आहेत. मी सोनियांना सॉरी म्हटले आहे,"
या सर्व पार्श्वभूमीवर गुरुवारी संध्याकाळी उशिरा G-23 च्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीतून अशी शक्यता वर्तवली जात आहे की, गटातील कोणताही नेता अध्यक्षपदासाठी दावा मांडू शकतो. त्यात मनीष तिवारी यांचे नाव आघाडीवर आहे.
मल्लिकार्जुन खरगे शुक्रवारी सकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर उमेदवारीही दाखल करू शकतात. खरगे यांच्याशिवाय मीरा कुमार, मुकुल वासनिक आणि कुमारी सेलजा यांचीही नावे चर्चेत आहेत.
गहलोत आता जी 23 गटाचे उमेदवार ?
गुरुवारी मध्यरात्रीपर्यंत जी 23 गटाचे नेते एकमेकांना भेटत होते. आनंद शर्मा यांच्या निवासस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंग होडा आणि खासदार मनीष तिवारी यांनी चर्चा केली. त्यानंतर आनंद शर्मा हे जयपूर हाऊस मध्ये पोहोचले. तेथे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत उतरले आहेत. तेथे जाऊन आनंद शर्मा यांनी मध्यरात्री अशोक गहलोत यांच्याशी चर्चा केली. कदाचित अशोक गहलोत आता जी 23 गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार असू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.