काँग्रेसकडून मोठी घोषणा; उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला विधानसभेचं तिकीट

काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे (UP Election 2022) उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपची (BJP) दिल्लीत खलबतं सुरू असताना काँग्रेसने (Congress) आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी पक्षाच्या 125 उमेदवारांची पहिली यादी गुरूवारी जाहीर केली. या यादीमध्ये 50 महिला उमेदवारांचा समावेश आहे. तसेच उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही काँग्रेसकडून तिकीट देण्यात आलं आहे.

प्रियांका गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. अद्याप कोणत्याही पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. काँग्रेसने मात्र आघाडी घेत महिलांना दिलेले वचन पाळलं आहे. प्रियांका यांनी विधानसभा निवडणुकीत 40 टक्के महिलांना तिकीट देण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 40 टक्के म्हणजे 50 महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच 50 तरुण उमेदवार असल्याचेही प्रियांका गांधी यांनी सांगितले.

Congress
UP Election 2022 : मौर्य यांचा भाजपला हिसका; सातवा धक्का देत पाडले भगदाड

उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीवर 2017 मध्ये बलात्कार झाला होता. या प्रकरणात भाजप नेता कुलदीप सिंग सेनगरला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निर्भया प्रकरणानंतर उन्नाव बलात्कार प्रकरण देशभरात गाजलं होतं. काँग्रेसनंही हा मुद्दा उचलून धरला होता. विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार हल्ला केला होता. प्रियांका गांधी यांच्यासह राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून योगी सरकारला धारेवर धरले होते.

आता काँग्रेसने थेट पीडितेची आई आशा सिंग यांना तिकीट देत निवडणुकीतही हा मुद्दा आणला आहे. त्याचप्रमाणे सोनभद्रमधील जमीन वादातून पुढे आलेले आदिवासी नेते रामराज गोंड यांनाही काँग्रेसने उमेदवारी देत आदिवासींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. गोंड हे सोनभद्र जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यांत 10 फेब्रुवारी व सात मार्च या कालावधीत मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 403 जागा आहेत. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या होत्या. तर भाजपने 325 जागा मिळवत राज्यात सत्ता मिळवली. समाजवादी पक्षाला 47 आणि बसपला 19 जागांवर समाधान मानावे लागले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com