Renuka Chowdhury On PM Modi: 'शूर्पणखा' मोदींच्या अडचणी वाढवणार ? मानहानीचा गुन्हा ?; काँग्रेस महिला नेत्याचे...

Renuka Chowdhury File Defamation Case Against PM Modi: चौधरी यांनी मोदींची एक जुनी व्हिडिओ क्लिप टि्वटवरुन शेअर
Renuka Chowdhury - PM Narendra Modi
Renuka Chowdhury - PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Congress: मोदी आडनावावरुन केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने काल (गुरुवारी) दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यावरुन काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्या रेणुका चौधरी या मानहानीच्या गुन्हा दाखल करणार आहेत.

राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आज सांयकाळी विरोधी पक्षाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसकडून आज संसद भवन ते विजय चौक दरम्यान मोदी सरकारच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे.

काही गैरकाँग्रेसी मुख्यमंत्री आणि विरोधी नेत्यांना राहुल गांधी यांनी सुनावलेल्या शिक्षेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांची त्यांनी पाठराखण केली आहे.

रेणुका चौधरी यांनी मोदींची एक जुनी व्हिडिओ क्लिप टि्वटवरुन शेअर केली आहे. चौधरी यांनी २०१८ मधील संसदेतील एका व्हिडिओचा आधार घेत मोदींच्या विरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले.

राहुल गांधी हे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढाई लढत आहेत, त्यासाठी ते कुठलीही माफी मागणार नाही, असे रेणुका चौधरी यांनी काल (गुरुवारी) म्हटलं आहे.

Renuka Chowdhury - PM Narendra Modi
BJP Mission 2024 : काशीमधून मोदी आज निवडणुकीचं बिगुल वाजवणार ; भाजप मिशन २०२४..

राहुल गांधी यांच्या शिक्षेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टि्वट करुन प्रतिक्रिया दिली आहे. पवारांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली आहे. राहुल यांना तुरूंगवासाची शिक्षा म्हणजे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काल (गुरुवार) शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी सार्‍या विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक देखील घेतली आहे.राहुल गांधींचे प्रकरण राष्ट्रवादीचे खासदार पी.पी. मोहम्मद फैजल यांच्या प्रकरणासारखे आहे. सध्या देशात असलेल्या या राजकीय स्थितीचा त्यांनी निषेध केला आहे.

Renuka Chowdhury - PM Narendra Modi
Sharad Pawar News: राहुल गांधींच्या शिक्षेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले...

2018 मध्ये काय म्हटले होते नरेंद्र मोदी..

७ फेब्रुवारी २०१८ रोजी राज्यसभेत बोलताना मोदींनी रेणुका चौधरी यांच्याबाबत मानहानीचे विधान केलं होतं. तत्कालीन सभापती वेंकैया नायडू यांनी सभागृहात रेणुका चौधरी यांना त्यांच्या हसण्यावरुन फटकारले होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की सभापती, महोदय आपल्याला विनंती आहे की आपण रेणुकाजींच्या हसण्यावर रागावू नका, कारण रामायण मालिकेनंतर असा हसण्याचा आवाज (शूर्पणखा) ऐकण्याची आज संधी मिळाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com