Rahul Gandhi On New Parliament Building : देशातील संसदेच्या नवीन इमारतीची पायाभरणी पंतप्रधान मोदी यांनी १० डिसेंबर २०२० रोजी केली होती. आता या संसद भवनाच्या उद्घाटनाची २८ मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचे उदघाटन करण्यात येणार आहे. यावरून काँग्रेस नेते माजी खासदार राहुल गांधी यांनी एक विधान केले आहे. त्या विधानावरून देशात राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नव्याने बांधलेल्या संसदेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांनी गुरुवारी (ता. १८) पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत बिर्ला यांनी पंतप्रधानांना त्याचे उदघाटनाचे निमंत्रण दिले. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संसदेच्या इमारतीचे उदघाटन करणार आहेत. यावरुन राहुल गांधी यांनी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावरुन राजकारण तापण्याची शक्यता आहे.
नवीन संसद भवनाच्या (Parliament) उद्घाटनासाठी २८ मे ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी स्वतानंतरविर वि.दा. सावरकर यांची जयंती आहे. त्यामुळे अनेक विरोधी पक्षांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तर राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, "नव्या संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती यांनींच करावे, पंतप्रधानांनी नाही."
दरम्यान, संसद भवनावर लोकसभा सचिवालयाने एक पुस्तिका तयार केली आहे. त्या पुस्तिकेनुसार नवीन संसद भवनाच्या लोकसभेच्या चेंबरमध्ये ८८८ सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था केली आहे. तर ३८४ सदस्य राज्यसभेत बसू शकणार आहेत. संयुक्त अधिवेशनादरम्यान सभागृहात एक हजार २७२ सदस्यांसाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.