Congress News : इंडिया आघाडीचा सस्पेन्स कायम; सत्ता स्थापन करणार की विरोधात बसणार ? खर्गे म्हणाले ...

2024 Parliamentary Election Results: इंडिया आघाडीची बुधवारी झालेल्या बैठकीस काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मित्र पक्षांची मते जाणून घेतली. यावेळी सर्वांनीच सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.
Mallikarjun Kharge, Rahul Gandhi
Mallikarjun Kharge, Rahul GandhiSarkarnama

Lok Sabha Election Result : इंडिया आघाडीची बुधवारी बैठक पार पडली. त्यानंतरही इंडिया आघाडीचा सत्ता स्थापन करणार की विरोधात बसणार ? याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्याविषयी सस्पेन्स कायम असल्याने उत्सुकता ताणली गेली आहे.

संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वच पक्षाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. देशातील जनतेने भाजपच्या भ्रष्टाचार विरोधात कौल दिला असल्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीतील घटक पक्षाची दिल्लीत बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या बैठकीप्रसंगी सुरुवातीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी स्वागत केले.

त्यासोबतच येत्या काळात एकत्रितपणे एनडीए आघाडी विरोधात लढायचे आहे. त्यामुळे सर्वच पक्षांना येत्या काळात जोरात लढायचे आहे. त्यासाठी आताच शुभेच्छा देत आहेत. देशातील जनतेनी दिलेला कौल हा भाजपविरोधात दिलेला आहे. मात्र, भाजप (Bjp) हे नाकारत असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, इंडिया आघाडीची बुधवारी झालेल्या बैठकीस काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मित्र पक्षांची मते जाणून घेतली. यावेळी सर्वांनीच सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे आता सर्व समविचारी पक्षांना इंडिया आघाडीत येण्याचं आवाहन करणार असल्याचे सांगितले.

जनतेनी पीएम मोदींच्या विरोधात कौल दिला आहे. जनतेनी भाजपला स्पष्ट बहुमत न देता एक संदेश दिला आहे. १८ व्या लोकसभेतील जनमत थेट भाजप विरोधात असल्याचे काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी स्पष्ट केले.

यावेळी झालेल्या बैठकीस काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, ज्येष्ठ नेते शरद पवार, संजय राऊत, प्रियंका गांधी, अखिलेश यादव, अभिषेक बॅनर्जी यांच्यासह इंडिया आघाडीतील घटक पक्षाचे नेते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com