Uttar Pradesh Political News : तीन राज्यांच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक एकतर्फी होईल, अशी भीती काँग्रेसला आहे. त्यात सर्वाधिक खासदार निवडूण येणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला २०१९ लोकसभा निवडणूकीत यश मिळाले नव्हते.
२०२४ मध्ये देखील काँग्रेसला असाच प्रतिसाद मिळाला तर काँग्रेसला सत्ता मिळवणे हे दिवास्वप्नच राहिल. त्यामुळे उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीने भारत जोडो यात्रे प्रमाणे 'युपी जोडो' यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेची सुरुवात २० डिसेंबर पासून सहानपूर येथून होईल.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडे यात्रा काढून काँग्रेसला कर्नाटक आणि तेलगंणामध्ये यश मिळवून दिले. मात्र, लोकसभेत मोठे मिळण्यासाठी उत्तर प्रदेश जिंकण्याशिवाय काँग्रेसकडे दुसरा पर्याय नाही. त्यात उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा पाठींबा मिळतो आहे. शिवाय काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपासोबत उत्तर प्रदेशात स्पर्धा करावी लागत आहे.
भाजपच्या तुलनेत काँग्रेसचे उत्तर प्रदेशातील संघटन दुबळे आहे. अनेक कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. त्यामुळे युपी जोडो यात्रेच्या मार्फत काँग्रेला आपले संघटना मजबूत करायचे आहे. कार्यकर्त्यांना नवीन कार्यक्रम देऊन त्यांच्या उत्साहा निर्माण करायचे आहे. उत्तर प्रदेशामध्येमध्ये काँग्रेस भाजपला टक्कर देऊ शकली तर देशभर वेगळा संदेश जाईल, अशी काँग्रस नेत्यांचे मत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या यात्रेची तयारी जोरदार सुरू आहे.
भारत जोडो यात्रे प्रमाणे राहुल गांधी या यात्रेत सहभागी होतील,अशी अपेक्षा स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, अजूनही राहुल गांधी सहभागी होणार की नाही हे निश्चित झालेले नाही. मात्र, काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी या यात्रेत सहभागी होणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काँग्रेस कमिटीने यात्रेसाठी मायक्रो प्लॅनिंग केले असून जिल्हा प्रभारी नेमण्यात आले आहेत. तसेच भोजनाच्या व्यवस्थेपासून राहण्याच्या ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. काँग्रेस या यात्रेच्या माध्यमातून महागाई, बेरोजगारीचे प्रश्न उपस्थित करणार आहे.
शिवाय यात्रेच्या दरम्यान येणाऱ्या मोठ्या तिर्थस्थस्थळांना देखील भेटी देण्यात येणार आहेत. बसपा आणि समाजावादी पक्षाकडून मात्र काँग्रेसच्या युपी यात्रेला महत्व देत नाहीत. काँग्रेसने आधी संघटन मजबूत करावे मग यात्रा काढावी, या पक्षाच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
(Edited by Roshan More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.