पंतप्रधान मोदींच्या हत्येचं षडयंत्र; 20 किलो आरडीएक्स अन् 20 हल्ल्यांच्या दाव्यानं खळबळ
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हत्येच्या हत्येच्या षडयंत्राचा खुलासा झाला आहे. पंतप्रधानांच्या हत्येची धमकी देणारा ई-मेल राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) आल्यानं खळबळ उडाली असून सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. या मेलमध्ये 20 स्लीपर सेल सज्ज असल्याचे आणि 20 किलो आरडीएक्सचा (RDX) उल्लेख करण्यात आला आहे. हत्येचा प्लॅन तयार असल्याचेही मेलमध्ये म्हटलं आहे. (Conspiracy to assassinate PM Narendra Modi)
एनआयएच्या मुंबई शाखेला हा मेल आला आहे. ई-मेलमध्ये म्हटलं आहे की, मेल लिहिणाऱ्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध आहेत. हल्याची योजना पूर्ण झाली आहे. स्लीपर सेलच्या माध्यमातून 20 किलो आरडीक्सचा वापर करून पंतप्रधान मोदींची हत्या करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. दोन कोटी नागरिकांना मारणार असल्याचेही त्याने मेलमध्ये म्हटले आहे. वीस शहरांमध्ये आरडीएक्सने हल्ला करणार असून या षडयंत्राचा खुलासा होऊ नये म्हणून आपण आत्महत्या करत असल्याचेही मेल पाठवणाऱ्याने म्हटलं आहे.
लवकरात लवकर मोदींची हत्या करायची आहे
पंतप्रधान मोदींच्या हत्या जेवढ्या लवकर शक्य होईल, तेवढ्या लवकर करायची आहे. मी पंतप्रधानांवर बॉम्ब टाकणार आहे. कारण त्यांनी माझं आयुष्य बरबाद केलं आहे. मी कुणालाच सोडणार नाही. दोन कोटी लोकांना मारून टाकेन. लोक मरत आहेत, आता ते माझ्या बॉम्बने मरतील. मी काही दहशतवाद्यांना भेटलो आहे. ते माझी मदत करतील. मला आनंद आहे की, मला बॉम्ब सहजपणे मिळाला. स्लीपर सेल 28 फेब्रुवारी रोजी अॅक्टिवेट केले आहेत. मला रोखून दाखवा, असं आव्हान मेल पाठवणाऱ्या व्यक्तीनं दिलं आहे.
दरम्यान, या मेलमध्ये करण्यात आलेल्या दाव्यामध्ये किती तथ्य आहे, याचा तपास आता सुरक्षा यंत्रणांकडून केला जात आहे. हा मेल मिळताच यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. एनआयएनने हा मेल गुप्तचर यंत्रणांनाही पाठवला आहे. हा मेल कुठून आला, कुणी पाठवला याचा तपास सुरू आहे. याआधीही पंतप्रधान मोदींच्या हत्येची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत यंत्रणात सतत सतर्क असतात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.