Congress President : अध्यक्षपदाचा वाद चव्हाट्यावर ; दोन गट आमनेसामने

Congress President : अध्यक्षपदावरून हरियाणा काँग्रेसमध्ये (Haryana Congress)वाद निर्माण झाला आहे. दोन गट आमनेसामने आले आहेत.
  congress president  latest news
congress president latest newssarkarnama

चंदीगड : "काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारायची नाही," असे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी सांगत आले आहेत. त्यांच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. (Congress President Election latest news)

राजस्थान आणि छत्तीसगडमधील काँग्रेस युनिट्सने राहुल यांना पक्षाचे अध्यक्ष (Congress President Election) बनवण्याचा ठराव केला आहे. ही दोन राज्ये आहेत जिथे काँग्रेस स्वबळावर सरकार आहे. आज महाराष्ट्र कॉंग्रेसची बैठक आहे, या बैठकीतही राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा ठराव करण्यात येणार आहे.

अध्यक्षपदावरून हरियाणा काँग्रेसमध्ये (Haryana Congress)वाद निर्माण झाला आहे. दोन गट आमनेसामने आले आहेत. केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे प्रमुख मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे दोन्ही गटांनी तक्रारी केल्या आहेत. भूपिंदरसिंग हुड्डा आणि अन्य नेत्यांमधील वाद आता चव्हाट्यावर आला आहे.

  congress president  latest news
Gram Panchayat Election 2022 : आज 547 ग्रामपंचायतींना गावकारभारी मिळणार

हरियाणातून आलेले पीसीसी सदस्य जे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करतील, त्यापैकी बहुतांश हुड्डा यांनी त्यांचे समर्थक बनवले आहेत, अशी त्यांची तक्रार आहे. किरण चौधरी, रणदीप सुरजेवाला, कुमारी सेलजा या प्रमुख नेत्यांनी मधुसूदन मिस्त्री यांच्याकडे गुप्तपणे तक्रारी केल्या आहेत. यामुळे दोन्ही गटात वाद निर्माण झाल्याने पक्षश्रेष्ठींची चिंता वाढली आहे.

रविवारी झालेल्या बैठकीत, PCC सदस्य AICC सदस्य निवडण्याचा अधिकार नवीन कॉंग्रेस अध्यक्षांकडे सोपवण्याचा ठराव एकमताने संमत करणार होते. पण राजस्थान आणि छत्तीसगडच्या धर्तीवर राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याची मागणी करणारा ठरावही पीसीसीकडून संमत करण्यात येणार होता, मात्र या वादामुळे हे दोन्ही प्रस्ताव सोमवारी मंजूर होणार आहेत. यासाठी बैठक होणार आहे.

कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होणार,याबाबत अनेक दिवसापासून चर्चा सुरु आहे. कॉंग्रेसचे अध्यक्षपदासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे नाव आघाडी आहे. पण त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यानंतर मुकुल वासनिक यांचे नावही सध्या आघाडीवर आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या आजच्या बैठकीत हे तीन ठराव होणार

  1. राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी ठराव

  2. प्रदेश अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणी निवडण्याचा अधिकार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देणार

  3. -AICC डेलीगेट म्हणजे राष्ट्रीय कांग्रेस प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांना देणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com