Mob attack on couple Viral Video: हिंदू मुलासोबत फिरते म्हणून जोडप्याला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

Indour News | छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम तरुणीला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली होती
Mob attack on couple Viral Video:
Mob attack on couple Viral Video:Sarkarnama
Published on
Updated on

Hindu Muslim Politics: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका हिंदू मुलासोबत फिरते म्हणून एका मुस्लिम तरुणीला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना घडली होती. असाच प्रकार आता इंदौरमधून समोर आला आहे. इंदौर (Indour) शहरात हिंदू मुलाबरोबर फिरते म्हणून एका तरूणीचा भररस्त्यात छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Couple beaten up for walking with Hindu boy; The video of the incident went viral)

या प्रकरणी आतापर्यंत शोएब लतीफ (वय 23), मुजम्मिल खान (वय 26), दानिश शेख (वय 28), अरबाज शेख (वय 23), शावेज शेख (वय 27) आणि आवेश हनीफ यांना मध्येप्रदेश पोलिसांनी अटक केली असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Mob attack on couple Viral Video:
Gajanan Kirtikar News : गजाभाऊ किर्तीकर आम्हाला सोडून जाणं, हे फार वेदनादायी होतं : शिवसेना खासदाराने बोलून दाखवली व्यथा

धक्कादायक बाब म्हणजे छळ करणाऱ्या तरुणांनीच या घटनेच्या व्हिडीओ (Viral Video) काढल्याचे दिसत आहे.अतिरिक्त पोलीस उपायुक्त राजेश रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात रात्री 11 वाजता एक तरुण आणि तरुणी हॉटेलमधून बाहेर पडताना एका जमावाने पाहिले. या जमावाने त्यांचा गाडीवर पाठलाग करत त्यांना काही अंतरावर जात घेराव घातला. तरुणाला शिवीगाळ करत त्यांनी दोघांनाही थांबवलं. (National News)

तीन-चार तरूण भर रस्त्यात एका मुलीला दम देत होते, एवढ्या रात्री हिजाब घालून कुठे फिरते? असे प्रश्न विचारत होते. त्यावर तरुणीने मी घरी सांगून मित्रासोबत बाहेर जेवायला गेल्याचही सांगितलं. पण तरीही या तरुणांचा जमाव संबंधित तरुणीशी आक्षेपार्ह शब्दांत बोलत होते. यातील एकाने तर त्या तरुणीचा मोबाईलही हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणीला त्रास देताना पाहून दोन नागरिक तरुण - तरुणाीच्या मदतीला धावले तर जमावातील एकाने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. (Crime News)

Mob attack on couple Viral Video:
Samruddhi Mahamarg 2nd Phase: समृद्धी महामार्गाचे शिंदे-फडणवीसांनी केलं लोकार्पण...; दुसऱ्या टप्प्यावर 'या' आहेत सुविधा

या प्रकरणी तरूणाने एफआयआर दाखल केली आहे. तसेच तरुणाने जमावाने आपल्याला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. अशी जोडपी शहराचं वातावरण खराब करत आहेत, असं म्हणत जमावातील एकजण तरूणाने आधार कार्ड नाव, मोबाईल नंबर विचारत होता. तर एकजण व्हिडीओ देखील बनवत होता. असही या तरुणाने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com