काँग्रेस आमदाराला न्यायालयाचा दिलासा! मोदींवर ट्विट केलं म्हणून झाली होती अटक

पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलल्या ट्विटमुळे कारवाई
Jignesh Mevani
Jignesh Mevani Sarkarnama
Published on
Updated on

गुवाहाटी : गुजरातमधील (Gujrat) काँग्रेसचे (Congress) आमदार जिग्नेश मेवानी (jignesh Mevani) यांना आज न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी आसाम पोलिसांनी (Assam Police) ही कारवाई केली होती. या प्रकरणी भाजपच्या (BJP) एका स्थानिक नेत्यानं पोलिसांकडे तक्रार दिली होती.

आसाममधील कोक्राझार येथील स्थानिक भाजप नेत्यानं मेवानी यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली होती. धार्मिक भावना दुखावना, धार्मिक तेढ निर्माण करणे, असे आरोप मेवानी यांच्यावर करण्यात आले आहेत. अखेर या प्रकरणी न्यायालयानं मेवानी यांना जामीन मंजूर केला आहे. आसाममध्ये पोलिसांनी तक्रार दाखल केल्यानंतर 24 तासांतच मेवानी यांना अटक झाली होती. गुजरातची आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ही कारवाई झाल्याचा दावा काँग्रेसनं केला होता.

Jignesh Mevani
नवनीत राणांना प्यायला पाणी नाही अन् वॉशरुमलाही जाऊ देत नाहीत! फडणवीसांचा गौप्यस्फोट

वडगाममधील पालनपूर सर्किट हाऊसमध्ये मेवानी यांना 21 एप्रिलला आसाम पोलिसांनी अटक केली होती. त्या रात्रीच त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले होते. तिथून रेल्वेने त्यांना आसामध्ये गुवाहाटीला नेण्यात आले होते. अटकेनंतर बोलताना मेवानी म्हणाले होते, एका ट्विटमुळे अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी याबाबत सविस्तर माहिती दिली नाही. माझ्याविरोधात खोटी तक्रार दाखल केली असून मी घाबरणार नाही. मी माझी लढाई सुरू ठेवणार आहे.

Jignesh Mevani
भोंग्याचा डाव उलटणार? राज्य सरकारनं केली मोदी सरकारचीच कोंडी

मेवानी यांच्या अटकेची माहिती मिळताच गुजरातमधील राजकीय वातावरण तापलं असून काँग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे. काँग्रेस कार्यकर्ते आणि मेवानी समर्थकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली होती. मेवानी अहमदाबादमध्ये पोचताच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांच्यासह अनेक आमदार अहमदाबाद विमानतळावर पोचले होते. या सर्वांनी जिग्नेश मेवानीच्या समर्थनात आणि आसाम पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com