काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर अखेर हरभजनसिंग म्हणाला...

हरभजनसिंग (Harbhajan Singh) आता राजकारणाच्या खेळपट्टीवर नशीब आजमावण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
Navjot Singh Sidhu and Harbhajan Singh

Navjot Singh Sidhu and Harbhajan Singh

Sarkarnama

Published on
Updated on

चंडीगड : क्रिकेटमध्ये आपल्या गुगलीने फलंदाजांना नाचवणारा हरभजनसिंग (Harbhajan Singh) आता राजकारणाच्या खेळपट्टीवर नशीब आजमावण्याच्या तयारी असल्याचे संकेत मिळत आहेत. तो भाजपमध्ये (BJP) मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. नंतर तो काँग्रेसमध्ये (Congress) जाण्याचे संकेत मिळू लागले आहेत. यावर अखेर हरभजननेच खुलासा केला आहे.

पंजाबमध्ये (Punjab) पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Assembly Election) होणार आहे. त्यासाठी काँग्रेससह सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसमधील वाद काहीप्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. पण सत्ता टिकवण्यासाठी यावेळी काँग्रेसला मोठी कसरत करावी लागण्याची स्थिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडून आता प्रसिध्द चेहऱ्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही दिवसांपुर्वीच प्रसिध्द गायक सिध्दू मूसे वाला काँग्रेसमध्ये दाखल झाला होता.

नंतर क्रिकेटपटू हरभजनसिंग हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनीच दोघांचा एक फोटो ट्विट करून तसे संकेत दिले होते. दोघांचा फोटो ट्विट करत त्यांनी एका ओळीत शक्यतांचे छायाचित्र असं म्हणत उत्सुकता वाढवली होते. त्यामुळे हरभजन काँग्रेसमधील प्रवेश करणार, असे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.

<div class="paragraphs"><p>Navjot Singh Sidhu and Harbhajan Singh</p></div>
धक्कादायक : केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांनाच केलं ब्लॅकमेल अन् मागितली अडीच कोटींची खंडणी

यावर हरभजनसिंगने खुलासा केला आहे. तो म्हणाला की, मी प्रत्येक पक्षातील राजकारण्यांना ओळखतो. मी एखाद्या पक्षात प्रवेश करण्याआधी त्याबाबत घोषणा करेन. मला पंजाबची सेवा करायची असून, ती राजकारणात उतरून अथवा अन्य मार्गाने करेन. अद्यापपर्यंत मी कोणताही निर्णय घेतलेला नाही. नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत झालेली भेट ही केवळ क्रिकेटपटू म्हणून होती.

<div class="paragraphs"><p>Navjot Singh Sidhu and Harbhajan Singh</p></div>
बारा आमदारांच्या निलंबनाचं काय? झिरवाळांचा अखेर सचिवालयाला आदेश

भाजपही हरभजनसिंग व युवराजसिंगला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानेही याबाबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले होते. दि दिल्ली क्राऊन या मीडिया कंपनीने एक ट्विट करत असे संकेत असल्याचे म्हटले होते. पण ते ट्विट रिट्विट करत हरभजनही ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे तो भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com