DA Hike 2026: जुलैमध्ये DA वाढला नाही; आता कधी वाढणार? जाणून घ्या ताजे अपडेट

Central Government Employees DA Update:केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) जुलैमध्ये वाढला नाही. आता ऑक्टोबरमध्ये 3 ते 4 टक्के DA वाढीची शक्यता, AICPI-IW आकडेवारी काय सांगते ते जाणून घ्या.
Central Government Employees DA Update
Central Government Employees DA UpdateSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे लक्ष सध्या महागाई भत्ता (Dearness Allowance-DA) वाढीकडे लागले आहे. दरवर्षी जानेवारी आणि जुलै या दोन टप्प्यांत महागाई भत्त्यात वाढ लागू केली जाते. मात्र, जुलै 2026 पासून लागू होणाऱ्या DA वाढीची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे महागाई भत्ता नेमका कधी वाढणार आणि कर्मचाऱ्यांना गोड बातमी कधी मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सध्या महागाई भत्ता 60 टक्के

केंद्र सरकारने यापूर्वी 1 जानेवारी 2026 पासून महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून 60 टक्क्यांपर्यंत वाढवला होता. आता कर्मचाऱ्यांचे लक्ष जुलैपासून लागू होणाऱ्या पुढील वाढीकडे आहे. सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नसली, तरी यावेळी महागाई भत्त्यात 3 ते 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामागचे प्रमुख कारण म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स (AICPI-IW) या निर्देशांकात सातत्याने होत असलेली वाढ. मार्च, एप्रिल आणि मे 2026 या तीन महिन्यांत निर्देशांकात वाढ नोंदवली गेली आहे. आता जून महिन्याचे आकडे जाहीर होणे बाकी असून, त्यावरच DA वाढीचा अंतिम निर्णय अवलंबून असेल.

Central Government Employees DA Update
Maharashtra Education: आता शिक्षकांच्या कामावर व्हॉट्सॲपवरून नजर! शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, प्रत्येक जिल्ह्यात 'विषय समित्या'

जुलैत घोषणा नाही,ऑक्टोबरमध्ये मिळू शकते भेट

जर जुलै महिन्यात DA वाढीची घोषणा झाली नाही, तरी कर्मचाऱ्यांनी निराश होण्याचे कारण नाही. गेल्या काही वर्षांचा पॅटर्न पाहता केंद्र सरकारने ऑक्टोबर महिन्यात किंवा दिवाळीपूर्वी महागाई भत्त्याची घोषणा केली आहे.

यामुळे यंदाही ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये दिवाळीपूर्वी केंद्र सरकारकडून महागाई भत्ता वाढीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना वाढीव DA ची रक्कम थकबाकीसह (Arrears) मिळण्याचीही शक्यता असते.

Central Government Employees DA Update
Kishore Patil: चाळीसगावच्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावरून महायुतीत ठिणगी; किशोर पाटीलांचा आमदारकी सोडण्याचा इशारा

महागाई भत्ता वाढल्याचा कोणाला फायदा होतो?

महागाई भत्त्यातील वाढीचा परिणाम केवळ मासिक पगारावरच होत नाही. त्याचा थेट परिणाम अनेक आर्थिक लाभांवरही होतो.

* मासिक पगारात वाढ

* निवृत्तीवेतन (Pension) वाढ

* भविष्य निर्वाह निधी (PF) संबंधित लाभ

* ग्रॅच्युइटीच्या रकमेवर परिणाम

* इतर महागाईशी संबंधित भत्त्यांमध्ये वाढ

देशातील सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाखांहून अधिक निवृत्तीवेतनधारक या निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत. यामध्ये रेल्वे, संरक्षण (डिफेन्स) आणि इतर केंद्रीय विभागांतील कर्मचारी व पेन्शनधारकांचाही समावेश आहे. मात्र, प्रत्येक कर्मचाऱ्याला मिळणारी वाढ त्याच्या मूळ वेतन (Basic Pay) आणि पे-लेव्हलनुसार वेगवेगळी असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com