धक्कादायक : सरपंचपदाची निवडणूक हरला अन् थेट गावातले रस्ते खोदले, पथदिवे काढले!

कोणत्याही निवडणुकीतील (Election) पराभव अनेकदा उमेदवारांच्या चांगलाच जिव्हारी लागतो.
The road dug up in Odisha
The road dug up in OdishaSarkarnama

भुवनेश्वर : कोणत्याही निवडणुकीतील (Election) पराभव अनेकदा उमेदवारांच्या चांगलाच जिव्हारी लागतो. त्यातून मग दोन गटांमध्ये वाद, हाणामारी अशा घटना घडतात. मतदारांना धमकावण्याचे प्रकार घडतात. पण सरपंचपदाची निवडणूक हरल्यानं संतापलेल्या उमेदवारानं थेट गावातील रस्त्तेच खोदल्याची घटना समोर आली आहे. त्याने गावातील पथदिवेही हटवत आपला राग व्यक्त केला.

ओडिशामधील (Odisha) गजपती जिल्ह्यातील रायगड भागात हा प्रकार घडला आहे. सरपंचपदाच्या (Sarpanch) २० फेब्रुवारी रोजी गंगाबडा गावची निवडणूक झाली होती. या निवडणुकीच्या सोमवारी जाहीर झालेल्या निकालात हरीबंधू करजी यांनी बारीक सबर यांचा १९६ मतांनी पराभव केला. करजी हे दुसऱ्यांदा ही निवडणूक जिंकले आहेत. मतदारांना मतदान करता येऊ नये, म्हणून सबर यांच्याकडून आधीही अनेक कुरापती करण्यात आल्याचा आरोप करजी यांनी केला आहे.

The road dug up in Odisha
युक्रेनमध्ये शिकणारी विद्यार्थिनी निघाली गावची सरपंच; जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू

करजी यांच्यासह इतर काही गावकऱ्यांनी मिळून सबर यांच्याविरोधात पोलीस ठाणअयात तक्रार दाखल केली आहे. निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सबर यांनी निराशेतून समर्थकांना सोबत घेत रस्ते खोदले आहेत. तर काही रस्त्यांवर मोठे दगड टाकून वाहतूकीसाठी बंद केले. सोमवारी त्यांनी पथदिवेही काढल्याचा दावा गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

सबर यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. गजापती जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी संग्राम पंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक तहसीलदार आणि पोलिसांनी गावाला भेट दिली असून गावातील रस्ते दुरूस्त केले आहेत. हे रस्ते आता वाहतूकीसाठी खुले करण्यात आले आहेत. दरम्यान, हे गाव आंध्र प्रदेशाच्या सीमेवरील २४ गावांपैकी एक असून जवळपास १५०० मतदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com