Sanjay Singh: आपचे खासदार संजय सिंह तब्बल वर्षभरानंतर संसदेत जाणार; उपराष्ट्रपतींचे मानले आभार!

MP Sanjay Singh will now go to parliament Rajya Sabha after one year: अध्यक्षांच्या आदेशाकडे वारंवार कानाडोळा केल्याप्रकरणी संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे 'आप'ला मोठा धक्का बसला होता.
MP Sanjay Singh will now go to parliament Rajya Sabha after one year
MP Sanjay Singh will now go to parliament Rajya Sabha after one yearSarkarnama

Delhi News: वर्षभरापासून निंलबित असलेले आम आदमी पक्षाचे (AAP)राज्यसभा खासदार संजय सिंह (Sanjay Singh) यांना दिलासा मिळाला आहे. राज्यसभा सचिवालयाने त्यांचे निलंबन मागे घेतले आहे. याबाबतचे परिपत्रक राज्यसभा सचिवालयाने काढले आहे. संजय सिंह यांचं २४ जुलै २०२३ रोजी निलंबन करण्यात आले होते.

मणिपूरच्या मुद्द्यावरून सभागृहात विरोधकांच्या गदारोळात संजय सिंह यांना राज्यसभेच्या अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशनात निलंबित केले होते. अध्यक्षांच्या आदेशाकडे वारंवार कानाडोळा केल्याप्रकरणी संजय सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे 'आप'ला मोठा धक्का बसला होता.

संजय सिंह यांनी एक्सवर आपले निंलबन मागे घेतल्याची माहिती दिली आहे. "जवळपास एक वर्षानंतर ससंदेत जाण्याची परवानगी मिळाली आहे. निलंबनाचा कालावधीत संपला आहे, असे त्यांनी सांगितले आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांचे संजय सिंह यांचे आभार मानले आहे.

संजय सिंह यांच्या निलंबनावर काल सुनावणी झाली. राज्यसभा विशेषाधिकार समितीच्या समोर संजय सिंह यांना माफी मागावी लागणार, अशी चर्चा होती. संजय सिंह यांच्याविरोधात असलेल्या विविध तक्रारी मागे घेण्यात आल्या आहेत. राज्यसभा विशेषाधिकार समिती आज आपला अहवाल राज्यसभेत ठेवणार आहे.

MP Sanjay Singh will now go to parliament Rajya Sabha after one year
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचे शिलेदार तीन मुद्यांवरुन शिंदे सरकारला जेरीस आणणार

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्या अध्यक्षतेखाली समिती संजय सिंह यांच्या विरोधात आलेल्या तक्रारीवर सुनावणी होणार आहे. भाजपचे नेते, मंत्री पीयूष गोयल यांनी संजय सिंह यांच्याविरोधात तक्रार दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com