Delhi Assembly 2025: केजरीवालांना हरवण्यासाठी काँग्रेस-भाजपनं बांधला चंग; दिग्गज नेत्यांमधील लढती रंगणार

AAP vs Congress vs BJP in Delhi: दिल्ली विधानसभा निवडूक 2025 दिग्गज नेत्यांमध्ये लढत; अरविंद केजरीवालांना हरवण्यासाठी काँग्रेस-भाजपनं रणनिती आखली
Delhi Vidhan Sabha Election
Delhi Vidhan Sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Delhi 23 Jan 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढत आहे. सत्ताधारी-विरोधकांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचे काय होणार याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. अनेक नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Delhi Vidhan Sabha Election
Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघाताला दोन व्यक्ती जबाबदार; अजितदादांनी सांगितला घटनाक्रम

काँग्रेस, भाजपसह सत्ताधारी आम आदमी पक्षातील अनेक बड्या नेत्यांचे राजकीय भविष्य या निवडणुकीत ठरणार आहे. आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासह विद्यमान मुख्यमंत्री आतिशी यांच्यासमोर विरोधकांनी मोठ आव्हान उभं केलं आहे.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय समन्वक अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे सुपुत्र प्रवेश वर्मा लढत आहेत. तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दिक्षित यांचे सुपुत्र संदीप दीक्षित रिंगणात आहेत. अरविंद केजरीवाल यांचा पराभव करण्यासाठी वर्मा आणि दीक्षित यांनी जोरदार प्रचार सुरु केला आहे.

Delhi Vidhan Sabha Election
Subhash Deshmukh : मला विधानसभा लढवायची नव्हती; सुभाष देशमुखांनी सांगितला निवडणुकीपूर्वीचा घटनाक्रम

नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात प्रामुख्याने केंद्रीय कर्मचारी यांचे निवासस्थान, झोपडपट्टी असा परिसर आहे. केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचारी यांच्यासाठी आठवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे. या मुद्दा भाजपने प्रचाराचा मुख्य मुद्दा केला आहे, तर दुसरीकडे संदीप दीक्षित यांनी झोपडपट्टी भागात लक्ष केंद्रीत केले आहे. या मतदारसंघातून 2013, 2015 आणि 2020 मध्ये केजरीवाल हे विजयी झाले आहेत.

जंगपुरा

माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे या निवडणुकीत पटपड़गंज येथून निवडणूक न लढता जंगपुरा या जागेसाठी मैदानात आहे. ते तीन वेळा विजयी झाले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे तरविंदर सिंह मारवाह आहेत.

मारवाह

मारवाह विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने फरहाद सूरी यांना तिकीट दिले आहे. ते माजी आमदार ताजदार बाबर यांचे सुपुत्र आहेत. हिंदू-मुस्लिम बहुल मतदारसंघ अशी या मतदारसंघाची ओळख आहे.

कालकाजी

कालकाजी विधानसभा मतदार संघातून आपच्या नेत्या, मुख्यमंत्री आतिशी या दुसऱ्यांदा निवडणूक लढत आहे. त्यांचा सामना भाजपचे माजी खासदार रमेश बिधूडी यांच्याशी होत आहे. काँग्रेसने राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांना तिकीट दिले आहे. रमेश बिधूडी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत.

दिल्ली आखाड्यातील हे मोठे चेहरे

  • अरविंद केजरीवाल- आम आदमी पार्टी

  • संदीप दीक्षित-काँग्रेस

  • मनीष सिसोदिया-आम आदमी पार्टी

  • अलका लांबा -काँग्रेस

  • मुख्यमंत्री आतिशी-आम आदमी पार्टी

  • देवेंद्र यादव -काँग्रेस

  • गोपाल राय-आम आदमी पार्टी

  • विजेंद्र गुप्ता-भाजपा

  • रमेश बिधूड़ी-भाजपा

  • अरविंद सिंह लवली-भाजपा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com