Delhi Assembly Election Live 2025 Results Updates : राजधानी दिल्लीत भाजपचा विजयी जल्लोष, PM मोदींची ग्रँड एन्ट्री

Delhi Assembly Election 2025 Results LIVE Updates Vote Counting : दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडलं. या निवडणुकीत 70 जागांसाठी एकूण 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. उमेदवारांपैकी दिल्लीकरांनी कोणाच्या गळ्यात विजयाची घालणार? याचा फैसला आज होणार आहे. याच विधानसभा निकालाची प्रत्येक अपडेट जाणून घेऊया.
Delhi Assembly Election 2025 Results
Delhi Assembly Election 2025 ResultsSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis latest News : आजच्या निकालाने केजरीवालांचा बुरखा फाटला

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्ली विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवल्याने आनंद होत आहे. दिल्लीत भाजची सत्ता आल्याचा आनंद आहे. भाजप नक्किच दिल्लीकरांच्या आशा, अपेक्षा पूर्ण करणार.

Ajit Pawar on Delhi Election : अजितदादा म्हणतात हे तर,'मोदींचे नेतृत्व आणि अमित शहांच्या कष्टच फळ'

अजित पवार पुढे म्हणाले, दिल्लीतील भाजपच्या यशामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कष्ट व निवडणूक व्यवस्थापनाचंही मोठं योगदान आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेव आणि त्यांच्या टीमने घेतलेली मेहनतही महत्वाची ठरली. आपचे नेते अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांच्यासारख्या नेत्यांना पराभूत करून दिल्लीकरांनी भाजप आणि ‘एनडीए’च्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे.

Rahul Gandhi latest News : दिल्ली निवडणुकीच्या मतमोजणीच्या दरम्यान राहुल गांधींविरुद्ध एफआयआर

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. देशविरोधी विधाने केल्याच्या आरोपाखाली ओडिशाच्या झारसुगुडा जिल्ह्यात त्यांच्याविरुद्ध हा एफआयआर दाखल करण्यात आला होता.

Arvind Kejriwal On Delhi Election result 2025 : जनतेचा निर्णय नम्रतेने स्वीकारतो - केजरीवाल

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालानुसार दिल्लीत आता भाजपचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तर आपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा जो निर्णय असेल तो आम्ही पूर्ण नम्रतेने स्वीकारतो. जनतेचा निर्णय शिरसावंद्य आहे. भाजपच्या विजयाबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. ज्या आशेने जनतेने त्यांना बहुमत दिले आहे, अशी आशा आहे. तो त्या अपेक्षा पूर्ण करतील, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत पराभव मान्य करत भाजपला शुभेच्छा दिल्या आहेत.

Next CM Of Delhi : दिल्लीचा आगामी मुख्यमंत्री कोण?

दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. तर सध्या भाजप नेते मनोज तिवारी, प्रवेश वर्मा, रविंद्र सिंह नेगी, दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहेत. मात्र तरीही दिल्लीचा मुख्यमंत्री कोण असणार याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदींच घेतील. त्यानंतर दिल्लीचा नवा सीएम कोण हे जाहीर होईल.

Amit Shah On Delhi Election Result : दिल्लीत खोट्या शासनाचा शेवट - शाह

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजप नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत आपला टोला लगावला आहे. दिल्लीत खोट्या शासनाचा शेवट झाला असून अहंकार आणि अराजकतेचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसंच इथे मोदींची गॅरंटी आणि विकासाच्या व्हिजनवर दिल्लीकर विजयी झाले आहेत. या प्रचंड जनादेशासाठी दिल्लीच्या जनतेचे मनापासून आभार. मोदींच्या नेतृत्त्वातील भाजपने आपली सर्व आश्वासने पूर्ण करून दिल्लीला देशातील एक नंबर राजधानी बनवण्याचा संकल्प केला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde statement on Delhi Election :  यह मोदीजी की गारंटी का कमाल है| - एकनाथ शिंदे 

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'यह मोदीजी की गारंटी का कमाल है' असं म्हणतं अभिनंदन केलं आहे. ट्विटरवर पोस्ट शेअर केली आहे.

NCP Sharadchandra Pawar Party Comment on Delhi Election : इंडिया आघाडी असती तर...; दिल्ली निवडणुकीवर शरद पवारांच्या नेत्याची पहिली प्रतिक्रिया

इंडिया आघाडी असती तर भाजपाला 20 जागा देखील मिळाल्या नसत्या, शरद पवारांच्या पक्षाची दिल्ली निवडणुकीवर प्रतिक्रिया

BJP Victory in Delhi Vidhan sabha : 27 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिल्लीत कमळ फुललं

27 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिल्लीत कमळ फुललं आहे. त्यातच भाजपच्या ट्विटर पेजवर आ रही है भाजप म्हणत कमळाचे फूल आणि इंडिया गेटचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे.

Delhi Election result Live : जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया यांचा पराभव 

जंगपुरा विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार तरविंदर सिंग मारवाह यांनी आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार मनीष सिसोदिया यांचा पराभव केला आहे.

Delhi Election result Live : कालकाजी विधानसभा मतदारसंघातून आतिशी जिंकल्या, भाजपचे रमेश बिधुरी पराभूत

दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. भाजपचे रमेश बिधुरी यांचा पराभव केला आहे.

Arvind kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पराभव

जंगपुरा मतदारसंघात मनीष सिसोदिया २४० मतांनी मागे आहेत.

जंगपुरा मतदारसंघात मनीष सिसोदिया २४० मतांनी मागे आहेत.

दिल्ली निवडणूक निकाल लाईव्ह: जंगपुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या ७ फेऱ्यांनंतर भाजप उमेदवार तरविंदर सिंग मारवाह २४० मतांनी आघाडीवर. आम आदमी पक्षाचे उमेदवार मनीष सिसोदिया दुसऱ्या क्रमांकावर आहेत. येथे मतमोजणीच्या एकूण १० फेऱ्या होतील.

Delhi Assembly Election 2025 Results : 27 वर्षाच्या प्रतिक्षेनंतर दिल्लीत कमळ फुललं

दिल्ली निवडणुकीची मतमोजणी आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. भाजप बहुमताने विजयाकडे वाटचाल करत आहे आणि आम आदमी पक्ष खूप मागे आहे.

Anna Hajare : या कारणांमुळे दिल्लीत 'आप'चा पराभव; अण्णा हजारेंनी सांगितलं कारण

दारु घोटाळ्यामुळे 'आप'चा पराभव, आचार विचार महत्त्वाचे हे 'आप'चे नेते विसरले, असं म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीच्या निकालांवर पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

PM Modi live : दिल्लीत भाजप विजयाचा गुलाल उधळणार

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शानदार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७:३० वाजता भाजप मुख्यालयाला भेट देतील.

Delhi Voting result live : दिल्लीत भाजपची मुसंडी, 40 जागांवर आघाडी

दिल्लीतील विधानसभा मतमोजणीचे कल हाती येण्यास सुरुवात झालीये. यामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे. तर आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजप 40 जागी आघाडीवर आहे.

दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल 300 मतांनी पिछाडीवर

नवी दिल्ली मतदारसंघात मतमोजणीच्या 6 व्या फेरीनंतर अरविंद केजरीवाल 300 मतांनी पिछाडीवर

Ramesh Bidhuri : AAP चा पर्दाफाश झालाय, दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल', भाजप नेते रमेश बिधुरी म्हणाले

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे.  दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल असे भाजप नेते रमेश बिधुरी म्हणाले आहेत.

 Delhi Election live : दिल्ली विधानसभा मतदारसंघात अरविंद केजरीवाल 343 मतांनी आघाडीवर

नवी दिल्ली निवडणूक निकालासाठी मोजण्यात आलेल्या 3 फेऱ्यांच्या मतमोजणीत आम आदमी पक्षाचे (आप) प्रमुख अरविंद केजरीवाल 343 मतांनी पुढे आहेत.

अरविंद केजरीवाल (आप) 6442 ६४४२

प्रवेश वर्मा (भाजप) 6099

संदीप दीक्षित (काँग्रेस) 1092

Aap Party Leader : आतिशी पिछाडीवर तर मनीष सिसोदिया आघाडीवर

दिल्ली निवडणुकीच्या मतमोजणीत कालकाजी येथून आतिशी पिछाडीवर तर जंगपुरा येथून मनीष सिसोदिया आघाडीवर आहेत.

Arvind Kejriwal :  दुसऱ्या फेरीत अरविंद केजरीवाल आघाडीवर

दिल्ली विधानसभेच्या मतांची मतमोजणी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीत अरविंद केजरीवाल आघाडीवर आहेत.

Delhi Election result 2025 live : कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार आघाडीवर?

रिठाला मतदारसंघातून भाजपचे कुलवंत राणा आघाडीवर

बल्लीमारनमधून आपचे इम्रान हुसेन आघाडीवर

ओखला मतदारसंघातून भाजपचे मनीष चौधरी आघाडीवर

मोती नगरमधून भाजपचे सतीश खुराणा आघाडीवर.

ग्रेटर कैलाशमधून आपचे सौरभ भारद्वाज आघाडीवर

शकूर बस्तीमधून आपचे सत्येंद्र जैन आघाडीवर.

राजौरी गार्डनमधून भाजपचे मनजिंदर सिंग सिरसा आघाडीवर.

करावलनगर मतदारसंघातून भाजपचे कपिल शर्मा आघाडीवर.

बिजवासन मतदारसंघातून भाजपचे कैलाश गेहलोत आघाडीवर.

रोहिणी मतदारसंघातून भाजपचे बिजेंद्र गुप्ता आघाडीवर.

चांदणी चौकातून भाजपचे सतीश जैन आघाडीवर.

Delhi Assembly result 2025 live : केजरीवाल 1500 मतांनी पिछाडीवर

दिल्ली विधानसभेच्या ईव्हीएमच्या मतांची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या कलांनुसार केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष पिछाडीवर आहे. तर भाजप आघाडीवर आहे. केजरीवाल 1500 मतांनी पिछाडीवर आहेत. तर तिकडे भाजप 43 जागांवर पुढे आहे.

Delhi Assembly result 2025 live : केजरीवालांसह आपचे अनेक दिग्गज पिछाडीवर

दिल्ली निवडणुकीचा निकालाचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र, आतापर्यंतचा निकाल सत्ताधारी आम आदमी पक्षासाठी धक्कादायक असा आहे. कारण आपचे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत. त्यामध्ये नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल, जंगपुरामधून मनीष सिसोदिया आणि कालकाजीमधून आतिशी पिछाडीवर आहेत.

Delhi Assembly Election Results 2025 : दिल्लीत भाजप 42 जागांवर आघाडीवर

मतमोजणीच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप 42 जागांवर पुढे आहे. तर आप त्यापाठोपाठ 27 जांगावर आघाडीवर आहे.

Delhi Election result 2025 live : भाजपची आतापर्यंत 36 जागांवर आघाडी

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार भाजप 36 जागांवर आघाडीवर आहे. तर आप 28 जागांवर आघाडीवर आहे.

Navi Delhi Election result 2025 live : भाजप-आपमध्ये चढाओढ

दिल्लीतील विधानसभा मतमोजणीचे सुरूवातीचा कल भारतीय जनता पक्षासाठी चांगला असल्याचं दिसत आहे. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत भाजप आघाडीवर आहे. भाजपने 20 तर आपने 17 जागांवर आघाडी घेतली आहे.

Navi Delhi Election result 2025 live : भाजप, आप 12 जागांवर आघाडीवर तर काँग्रेसने खातं उघडलं

दिल्लीत भारतीय जनता पक्षाने एक्झिट पोलने अंदाज वर्तवल्यानुसार सुरूवातीपासून जोरदार मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानुसर भाजप सध्या 12 जागांवर आघाडीवर आहे. तर सत्ताधारी आम आदमी पक्ष देखील 12 जागांवर आघाडीवर आहे. मात्र, काँग्रेसचा केवळ एक उमेदवार आघाडीवर आहे.

Delhi Vidhan Sabha result 2025 live : भाजप 12 जागांवर आघाडीवर तर केजरीवाल पिछाडीवर

दिल्ली विधानसभेची मतमोजणी सुरू झाली असून सुरूवातीच्या कलानुसार आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल पिछाडीवर आहेत. तर दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी या देखील पिछाडीवर आहेत. तर दुसरीकडे भाजपने मात्र, सुरूवातीपासून जोरदार मुसंडी मारली आहे. त्यानुसार भाजप आता 12 जागांवर आघाडीवर आहे.

Delhi Assembly election 2025 news LIVE : मतमोजणीच्या सुरूवातीलाच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी पिछाडीवर

दिल्लीत मतमोजणीला सुरूवात झाली असून मतमोजणीच्या सुरूवातीलाच दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिषी पिछाडीवर आहेत.

Delhi Election result 2025 News live : पोस्टल मतमोजणीत भाजप 6 जागांवर आघाडीवर

दिल्लीत विधानसभेसाठी झालेल्या मतदानाच्या मतजमोजणीला आता सुरुवात झाली आहे. सुरूवातीला पोस्टल मतमोजणी सुरू असून यामध्ये भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आताच्या ताज्या आकडेवारीनुसार भाजप 6 जागांवर आघाडीवर आहे.

Delhi Election result 2025 live  : 8 वाजल्यापासून सुरू होणार मतमोजणी

दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासात जाहीर होणार आहे. या मतमोजणी 8 वाजल्यापासून सुरूवात होणार आहे.

Assembly election vote counting live : देशाची राजधानीत सत्ता कोणाची? आज जाहीर होणार

दिल्ली विधानसभ निवडणुकीचा निकाल आज (8 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजप आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये प्रमुख लढत झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आता अखेर देशाच्या राजधानी नेमकी कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता आज संपणार आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष जिंकला तर या ते सलग तिसऱ्यांचा दिल्लीचं तख्त आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरतील. मात्र, यंदा दिल्लीत सत्तांतर होईल असे अनेक संस्थांच्या एक्झिट पोल्सचे अंदाज आहेत. त्यामुळे भाजप, आप की काँग्रेस दिल्लीत सत्ता कोणाची याचा फैसला आता थोड्याच वेळात होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com