Delhi, 30 Jan 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून सर्वच राजकीय पक्ष प्रचाराचा धुराळा उडवित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली दौऱ्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात ते व्यासपीठावर चक्क भाजप उमेदवाराच्या पाया पडताना दिसत आहेत. या व्हिडिओवर नेटकरींच्या उलट-सुलट प्रतिक्रिया उमटत आहेत.
मोदींच्या प्रचार दौऱ्यात करावल नगर परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीनंतर पटपडगंज विधानसभा मतदारसंघाातील भाजपचे उमेदवार रविंद्र नेगी यांनी पीएम मोदी यांच्या प्रथम पाया पडल्या. त्यानंतर मोदी चक्क तीन वेळा खाली वाकून नेगी यांच्या पाया पडले. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी दिल्लीच्या करावल परिसरात रॅलीचे आयोजन केले होते, या रॅलीनंतर झालेल्या सभेत मोदींनी आम आदमी पार्टीचा समाचार घेतला. आपचे राष्ट्रीय समन्वयक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यमुना नदीच्या पाण्यात विष मिसळल्याच्या विधानावरुन मोदींनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
त्यावेळी व्यासपीठावर आलेले पटपड़गंज विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार रविंद्र सिंह नेगी त्याठिकाणी आल्यानंतर नेगी अगोदर मोदींच्या पाया पडले. त्यानंतर मोदी नेगींच्या तीन वेळा पाया पडले. हा सारा प्रसंग पाहून व्यासपीठावरील मान्यवरांच्या भुवया उंचावल्या.
रविंद्र सिंह नेगी कोण आहेत, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. नेगी हे मुळ उत्तराखंड येथील रहिवासी आहेत. सध्या ते दिल्ली महानगरपालिकेचे सदस्य आहेत. विनोद नगर वार्ड -198 मधून ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. विनोद नगर वार्ड हा परिसर पटपड़गंज विधानसभा परिसरात येतो.
प्रसिद्ध व्यक्तिमत्व अशी रविंद्र नेगी यांची या परिसरात ओळख आहे. पटपड़पगंज मतदारसंघातून त्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत आपचे नेते, माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध लढत दिली होती. त्यांचा अवघ्या ३ हजार २०७ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळेच पक्षानं त्यांना दुसऱ्यांदा संधी दिली आहे. त्यांच्याविरोधात आपचे अवध ओझा रिंगणात आहेत. रविंद्र नेगी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही चांगले वजन आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.