
BJP Youth Leadership Senior Leaders Removed: भाजपने (BJP) संघटनात्मक बांधणीला सुरवात केली आहे. देशभर नियुक्त्या सुरु आहेत. युवा नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी भाजपकडून प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी विविध मंडळांच्या नियुक्तीमध्ये युवकांना संधी देण्यात येत आहे.
मंडळ प्रमुखांची जबाबदारी ही 35 ते 45 वयोगटातील युवकांच्या खाद्यांवर असणार आहे. त्यामुळे 45 पेक्षा अधिक वयोमान असलेल्या नेत्यांचा भाजपनं पत्ता कट केला आहे. यात फक्त अनुसूचित जाती व महिलांना दोन वर्षांची सूट मिळणार आहे.
दिल्ली भाजपने हा निर्णय घेतला आहे. संघटना मजबूत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दिल्ली भाजपमधील बहुतांश मंडळांचे पदाधिकारी बदलणार येणार आहेत. प्रत्येक बुथवर 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर मंडल अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. सध्या याची प्रक्रिया सुरु झाली आहे. बूथ पातळीपासून प्रदेशाध्यक्षापर्यंत हा नियम लागू असेल, अशी चर्चा आहे. माजी आमदार महेंद्र नागपाल यांना निवडणुक अधिकारी नेमलं आहेत.
महाराष्ट्रात राज्यभरात एकूण 1221 मंडळ स्थापन करण्यात आले असून त्यापैकी 963 मंडळ अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 1221 मंडळ स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 963 मंडळांची रचना जाहीर केली आहे. यात 258 नव्या मंडळांचा समावेश आहे.
मुंबई विभाग 111
पश्चिम महाराष्ट्र 222
विदर्भ 313
कोकण-ठाणे विभाग 184
उत्तर महाराष्ट्र 184
मराठवाडा 207
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.