नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आज (ता.१८ सप्टेंबर) आम आदमी पक्षाची (AAP) पहिली राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी 'आप'चे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार टीका केली आहे.
आम आदमी पार्टी राक्षसांना मारण्याचे काम करत आहे. लहान कृष्णाने जसे मोठ्या मोठ्या राक्षसांचा वध केला होता तश्याच प्रकारे आमची छोटीशी पार्टी देशातील मोठया शक्तीशी लढत आहे. आम आदमी पक्षाचा वाढता प्रभाव पाहून भाजप घाबरली असून 'आप'चे कव्हरेज दाखवू नये म्हणून मिडियाच्या मालकांशी आणि संपादकांना पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार हिरेन जोशी यांच्याकडून धमक्या आणि शिवीगाळ केली जात आहे,असा गंभीर आरोप केजरीवाल यांनी केला आहे. (Cm Arvind Kejriwal, Pm Narendera Modi News)
अरविंद केजरीवाल म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मीडिया सल्लागार हिरेन जोशी यांनी अनेक टीव्ही चॅनेलच्या मालकांना आणि संपादकांना गुजरातमध्ये 'आप'ला कव्हरेज देऊ नये, यासाठी धमकी दिली जात आहे. तसेच त्यांना शिवीगाळ केली जात आहे. मात्र, त्यांनी जर या चॅटींगचे स्क्रीनशॅाट आणि फोन रेकॅार्डिंग सोशल मीडियावर टाकले तर पंतप्रधान मोदी आणि जोशी यांना तोंड दाखवता येणार नाही,असा घणाघातही त्यांनी केला.
केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, गुजरात निवडणुकीत पराभवाची भीती असल्याने ते भ्रष्टाचाराशी लढण्याच्या नावाखाली 'आप'ला चिरडण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी सरकार आपच्या मंत्री आणि नेत्यांना खोट्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजप आपची वाढती लोकप्रियता ते पचवू शकत नाही. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी 'आप'च्या वाढत्या प्रभावामुळे भाजप इतका हतबल झाला आहे,अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.