Manish Sisodia : दिल्लीत काँग्रेस सावध, पण माकन आक्रमक; सीबीआयचे कौतूक तर ‘आप’वर भ्रष्टाचाराचा आरोप

Delhi Congress : केंद्राला केंद्रीय यंत्रणांचा योग्य वेळी वापर करण्याचीही केली विनंती
Ajay Makan
Ajay MakanSarkarnama

Ajay Makan : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी अटकेनंतर राजीनामा दिला आहे. या प्रकरणानंतर दिल्ली काँग्रेस सावध भूमिका घेत आहे. असे असताना काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आपवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत हल्लाबोल केला. तसेच दुसरीकडे सीबीआयने केलेल्या कारवाईचे स्वागतही केले.

मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांना अटक केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी केंद्र सरकारवर टीका केली. गेहलोत यांनी केंद्रीय यंत्रणा दहशत पसरवत असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख जयराम रमेश (Jayram Ramesh) यांनी या कारवाईबाबत साशंकता व्यक्त केली होती.

Ajay Makan
Arvind Kejriwal : सिसोदियांनी भाजपात प्रवेश केला तर...; केजरीवालांचा मोदींवर घणाघात

त्यानंतर दिल्लीतील नेते अजय माकन (Ajay Makan) यांनी मात्र सीबीआयच्या कारवाईचे स्वागत केले. ते म्हणाले, "आप पक्षाला सुमारे १०० कोटी रुपये मिळाल्याचे सिद्ध झाले आहे. ते पैसे त्यांनी गोव्यात काँग्रेसविरुद्ध निवडणूक लढविण्यासाठी वापरले. आप उदयाला आली अन काँग्रेस कमकुवत झाली. त्यातून आप ही भाजपाची बी टीम असल्याचे स्पष्ट होते."

माकन पुढे म्हणाले की, "केंद्र सरकार केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांविरोधात कमी वापर करते. एखाद्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर कारवाई होते, त्यावेळी ती कारवाई राजकीय सुडातून झाल्याचा आरोप होतो. केंद्राने अशा यंत्रणांचा काळजीपूर्वक वापर करण्याची विनंतही आहे. त्यामुळे लोकांचाही केंद्रावर विश्वास बसेल."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com