खास 'देशभक्ती बजेट'ची तरतूद; राजधानीत ५०० राष्ट्रध्वज फडकणार

National Flag of india : Delhi Government ची ५०० राष्ट्रध्वज फडकवण्याची घोषणा.
National flag of India
National flag of IndiaSarkarnama
Published on
Updated on

दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आता तिरंगामय होणार आहे. दिल्ली सरकारकडून (Delhi Government) राजधानीत ११५ फुटांचे तब्बल ५०० राष्ट्रध्वज फडवले (National Flag of india) जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील ७५ राष्ट्रध्वज 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' (Azadi Ka Amrit Mahotsav) अंतर्गत आज फडकवण्यात आले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या हस्ते आज दिल्लीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. दिल्ली सरकारकडून या उपक्रमासाठी विशेष अशा 'देशभक्ती बजेट'ची तरतूद केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी बोलताना म्हणाले, देशासाठी आज अभिमानाचा दिवस आहे. राजधानीत ११५ फुटांचे ७५ तिरंगा ध्वज फडकवण्यात आले आहेत. ३१ मार्चपर्यंत यात वाढ होवून संपुर्ण दिल्लीमध्ये एकूण ५०० राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहेत. कोट्यावधी देशवासियांच्या मनात राष्ट्र-भक्तीची भावना कायम ठेवण्यासाठी या उपक्रमाची मदत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

National flag of India
धक्कादायक; सेना आमदाराला ED शी सेटलमेंट करण्याची ऑफर

दिल्लीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार?

तसेच यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, दिल्ली हे जगातील बहुदा एकमेव शहर असावे जिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर देशाचा ध्वज फडकवण्यात येणार आहेत. त्यामुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दिल्लीच्या नावाची नोंद होणार आहे.

देशभक्ती बजेटची तरतुद :

दिल्ली सरकारने या राष्ट्रध्वजांसाठी विशेष अशा देशभक्ती बजेटची तरतुद केली आहे. यातुल तब्बल १०४ कोटी ३७ लाख रुपयाच्या खर्चाला मंजूरी देण्यात आली आहे. दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणाले, राष्ट्रध्वजाला सार्वजनिक ठिकाणी जसे की, बागिचे, बाजार, सार्वजिनक मैदाने, रहिवासी इमारती, अशा ठिकाणी फडकवण्यात येणार आहेत. या राष्ट्रध्वजाच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक महापालिका, नगरपालिका आणि दिल्ली सरकार यांच्याकडे एकत्रितपणे असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com