AAP Councilor Sunita Joins BJP : महापौर निवडणुकीपूर्वीच केजरीवालांना झटका ; AAP नगरसेविका भाजपमध्ये..

AAP Councilor Sunita Joins BJP : एका नगरसेविकेने 'आप'चा झाडू फेकून भाजपचं कमळ हाती घेतलं आहे.
AAP Councilor Sunita Joins BJP News
AAP Councilor Sunita Joins BJP News Sarkarnama
Published on
Updated on

Delhi ncr AAP Councilor Sunita Joins BJP : दिल्ली महापौर पदावरुन राजकारण पेटलं असताना महापौर निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीला झटका बसला आहे.

आम आदमी पक्षाच्या एका नगरसेविकेने 'आप'चा झाडू फेकून भाजपचं कमळ हाती घेतलं आहे. एका नगरसेविकेमुळे निवडणुकीत मोठा झटका आम आदमी पक्षाला बसू शकतो, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

आम आदमी पार्टीच्या नगरसेविका सुनीता यांनी 'आप'ला सोडचिठ्ठी देत आज (सोमवारी) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीच्या वार्ड क्रमांक १३० मधून त्या निवडून आल्या आहेत. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थित त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

येत्या २६ एप्रिल रोजी महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत २५० जागापैकी १०४ जागा भाजपनं पटकावल्या आहेत. तरआम आदमी पक्षाने १३४ जागांवर विजय मिळवला आहे.

AAP Councilor Sunita Joins BJP News
Mamata - Nitish Meeting: मोदींच्या विरोधात एकजूट ; देशातील तीन बड्या नेत्यांमध्ये खलबते..

सत्ताधारी आम आदमी पार्टी (एएपी) आणि विरोधीपक्ष भारतीय जनता पार्टी (बीजेपी) एकमेकांच्या विरोधात न्यायालयात गेले आहेत. दिल्ली उच्चन्यायालयाने स्थायी समिती सदस्यांच्या निवडीवर बंदी घातली आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या सहा सदस्यांच्या निवडीचा मुद्यांवर अडचणी निर्माण झाल्या आहेत.

AAP Councilor Sunita Joins BJP News
Mohan Bhagwat News: धर्म मानणाऱ्या भारताने कुणाचाही फायदा उचलला नाही ; मोहन भागवतांनी रशिया, अमेरिकेला खडसावले..

विद्यमान महापौर शैली ओबेरॉय यांच्या कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपला आहे. पण पुन्हा एकदा शैली ओबेरॉय महापौर पदासाठी रिंगणात आहेत.

स्थायी समितीच्या निवडणुकीत वाद झाला असून भाजपला सदस्य मिळालेले एक मत अवैध असल्याचे शैली ओबेरॉय यांनी सांगितले आहे. त्याला भाजपने विरोध केला असून निवडणुक पुन्हा घेण्याची त्यांनी मागणी केली आहे.

भाजपच्या नगरसेविका कमलजीत सहरावत आणि शिखा राय यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com