Kangana Ranaut Vs Jaya Bachchan : 'टोपी घातलेली भांडकुदळ कोंबडी'; चिडखोर जया बच्चन यांना कंगनांनं डिवचलं

Kangana Ranaut Criticizes Jaya Bachchan for Pushing Selfie Taker in Delhi Parliament : चिडलेल्या जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यावरून कंगना रनौत यांनी त्यांना डिवचलं आहे.
Kangana Ranaut Vs Jaya Bachchan
Kangana Ranaut Vs Jaya BachchanSarkarnama
Published on
Updated on

Delhi Parliament incident : दिल्ली संसद भवनात समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांच्याबरोबर विनापरवानगी सेल्फी घेणाऱ्याला ढकल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. यावरून भाजप खासदार कंगणा रनौत यांनी डिवचलं आहे.

'ही समाजवादी पार्टीची टोपी त्यांच्या डोक्यावर कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसते. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही. जया बच्चन स्वतः एका भांडकुदळ कोंबडीसारख्या दिसतायत. हे खरंच खूप अपमानास्पद आहे', असा टोला कंगणा रनौत यांनी लगावला आहे.

समाजवादी पक्षाच्या नेत्या (Samajwadi Party) जया बच्चन त्यांच्या वागण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन यांचा स्पष्टवक्तेपणा आणि सततची चिडचिड, या ट्रोल देखील होतात. दिल्ली संसद भवन आवारात चिडलेल्या जया बच्चन यांचा आणखी एक व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

जया बच्चन संसद भवनाच्या आवारात असून त्यांच्यासोबत फोटो काढणाऱ्या व्यक्तीला त्या रागानं ढकलून देतात, असा हा व्हिडिओ आहे. समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर भाजप खासदार कंगना रनौत (Kangana Ranaut) यांनी जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut Vs Jaya Bachchan
Mumbai Dadar Kabutarkhana : 'कबुतरांचे दाणे तणावानं तापले'; मराठी एकीकरण समिती मैदानात, जैन मंदिराचा दरवाजा बंद, पोलिसांच्या बंदोबस्तामुळं छावणीचं स्वरूप

खासदार कंगना रनौत यांनी त्यांच्या समाज माध्यम पेजवर जया बच्चन यांचा व्हायरल व्हिडीओ शेअर करत, "सर्वाधिक बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला. लोक यांचे नखरे आणि बकवास यासाठी झेलतात, कारण या अमिताभ बच्चन यांच्या पत्नी आहेत", असा टोला लगावला आहे.

Kangana Ranaut Vs Jaya Bachchan
Dahi Handi World Record: विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदाला मंत्री सरनाईकांची 'संस्कृती' देणार 25 लाखांचे 'लोणी'; यंदाच्या दहीहंडीची थीम ‘शोले’

कंगन रनौत एवढ्यावरच थांबल्या नाहीत, तर "जया बच्चन यांच्या डोक्यावर समाजवादी पार्टीची टोपी कोंबडीच्या तुऱ्यासारखी दिसतेय. त्या स्वत: कोंबडीसारख्या दिसत आहेत. लज्जास्पद गोष्ट आहे ही. ही टोपी जी त्यांनी त्यांच्या डोक्यावर घातली आहे, ती कोंबड्याच्या तुऱ्यासारखी दिसतेय आणि जया बच्चन स्वतः एका भांडकुदळ कोंबडीसारख्या दिसत आहेत. हे खरंच खूप अपमानास्पद आहे," असा टोला लगावला आहे.

सर्वसामान्य व्यक्तीसोबत जया बच्चन ज्यापद्धतीने वागल्या आहेत, त्याचा कंगना रनौत यांनी जोरदार निषेध केला आहे. कंगना यांनी त्यांच्या समाज माध्यम पेजच्या या व्हिडिओ खाली "सर्वात बिघडलेली प्रिविलेज महिला. लोक तिचा राग सहन करतात कारण ती अमिताभ बच्चन यांची पत्नी आहे," असा खणखणीत टोला लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com