IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरणी दिल्ली पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; ‘या’ कलमांतर्गत गुन्हा दाखल

Delhi Police UPSC Cheating Forgery : पूजा खेडकर यांच्याभोवतीचा फास आवळत चालला असून यूपीएससीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
IAS Pooja Khedkar
IAS Pooja KhedkarSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. यूपीएससीच्या तक्रारीनंतर शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या नोकरीवरही टांगती तलवार आली आहे.

पूजा खेडकर यांनी यूपीएससीची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत यूपीएससीकडूनच खुलासा करण्यात आला आहे. त्यांनी परीक्षेला बसण्यासाठी असलेल्या निश्चित संधी संपल्यानंतरही फसवणूक करून परीक्षा दिल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

परीक्षेस पात्र ठरण्यासाठी खेडकर यांनी वैयक्तिक माहिती बदल केला. त्यामध्ये नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, फोटो, सही या माहितीचा समावेश आहे. यूपीएससीने केलेल्या चौकशीमध्ये हे समोर आले आहे. त्यानुसार आयोगाकडून दिल्ली पोलिसांत तक्रार देण्यात आली होती.

IAS Pooja Khedkar
Video Police Lathi Charge : पोलिसांचा पोलिसांवरच लाठीचार्ज; मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर राडा

यूपीएससीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तातडीने पावले उचलत पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नवीन भारतीय न्याय संहिता या काद्यातील बनावट कागदपत्रे, फसवणूक या कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दिव्यांग कायद्यानुसारही गुन्हा दाखल केला आहे.

दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच यूपीएससीने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तुमची शिफारस रद्द का करू नये, पुढील सर्व परीक्षांना बसण्यास मनाई का करू नये, अशी विचारणा केली आहे. खेडकर यांचा खुलासा आल्यानंतर यूपीएससीकडून पुढील कारवाई केली जाऊ शकते.

IAS Pooja Khedkar
Yogi Adityanath : योगींच्या एका निर्णयामुळे ‘एनडीए’त वादाची ठिणगी; थेट मोदींचं नाव घेत JDU ने फटकारलं...

खेडकर यांना मसूरी येथील प्रशिक्षण संस्थेतही 23 जुलैपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. महाराष्ट सरकारने पाठवलेल्या अहवालानंतर संस्थेकडून त्यांना तातडीने प्रशिक्षण थांबवून बोलवून घेण्यात आले आहे. त्यामुळे तिथे त्यांच्याबाबत काय निर्णय घेतला जाणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र खोटे दिल्याचा आरोपही होत आहे. त्याच्याही चौकशी सुरू आहे. त्यामुळे याबाबत सत्य स्थिती समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com