Amit Shaha news| राममंदिर भूमीपूजनाच्या वर्धापन दिनीच कॉंग्रेसचे मुद्दाम आंदोलन; शहांचा आरोप

Congress Protest| Amit Shaha| काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (5 ऑगस्ट) महागाई विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात आले.
Amit Shah
Amit Shah
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (5 ऑगस्ट) महागाई विरोधात देशव्यापी आंदोलन करण्यात आले. देशभरात ठिकठिकाणी कॉंग्रेसने (Congress) हे आंदोलन केले. या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीला जणू छावणीचे रुप आले होते. आंदोलनाला बसलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि प्रियंका गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याशिवाय महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर अनेक नेत्यांनाही पोलिसांनी अटक केली. अशात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या आंदोलनाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

कॉंग्रेसच्या आंदोलनाला अमित शहा यांनी कडाडून विरोध केला आहे. ''काँग्रेसने प्रदर्शनासाठी आजचाच (५ ऑगस्ट) दिवस का निवडला? आंदोलनासाठी काळेच कपडे का घालण्यात आले,असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गेल्या वर्षी याच दिवशी पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील श्री रामजन्मभूमी मंदिराची पायाभरणी केली होती. आजचा दिवस साजरा करायला हवा होता, पण कॉंग्रेसने नेहमीच द्वेषाचे राजकारण केलं आहे, आजही त्यांनी तोच मार्ग अवलंबत आंदोलनासाठी हाच दिवस निवडला, या आंदोलनातून ते राममंदिराला विरोध आहे, असेच दिसून येत होते, असा आरोप शहा यांनी केला.

Amit Shah
राहुल-प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; अक्षरश: फरफटत नेले

कॉंग्रेसने केलेल्या काळ्या कपड्यांतील आंदोलनावरही अमित शहांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. ''आत्तापर्यंत दररोज सामान्य कपड्यांमध्ये आंदोलन केले जात होते. पण आज कॉंग्रेसने काळ्या कपड्यातच आंदोलन का केले? काँग्रेस प्रदीर्घ काळ सत्तेत होती, पण राम मंदिराचा वाद मिटवला नाही, असाही आरोप शहा यांनी केला. त्याचवेळी पंतप्रधान मोदींनी या दिवशी अयोध्येत राम मंदिराची पायाभरणी करून हा 500 वर्षांचा वाद संपुष्टात आणला, असे म्हणत त्यांची पाठराखणही केली आहे.

अनेक ठिकाणी त्यांचा पराभव होऊनही कॉंग्रेस धृवीकरण सोडत नाही. पण मला वाटते की या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने गुप्तपणे धृवीकरणाचा अजेंडा पुढे नेला आहे. पण तुष्टीकरणाचे धोरण देशासाठी चांगले नाही आणि काँग्रेससाठीही चांगले नाही. असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच, ईडीच्या कारवाईवर प्रत्येकाने देशाच्या कायद्याचा पूर्ण आदर केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com