फडणवीसांनी प्रचारसभेतच केली पहिल्या मंत्र्यांच्या नावाची घोषणा

Goa Assembly Election | Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस सध्या गोव्यात भाजपच्या प्रचार दौऱ्यावर आहेत.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

पणजी : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सध्या गोव्यात भाजपच्या (Goa Bjp) प्रचारात व्यस्त आहेत. नेत्यांचे पक्षप्रवेश, नाराजांची मनधरणी, तिकीट वाटप अशा सर्व टप्प्यांवर महत्वाची भुमिका बजावल्यानंतर ते आता प्रचाराला लागले आहेत. यावेळी महाराष्ट्रातील पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्याय, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव आणि माजी मंत्री बाळा भेगडे ही महाराष्ट्र भाजपची टीम देखील त्यांच्या जोडीला गोव्यात आहे.

काल गोवा विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राजेश पाटणेकर (Rajesh Patnekar) यांच्या प्रचारसभेत हे सर्व नेते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ केला. मात्र नारळ वाढवतानाची एक गोष्ट त्यांनी सभेत बोलताना आवर्जून सांगितली. ते म्हणाले, "मला नारळ फोडताना तो दोन ते तीन वेळा आपटावा लागला. त्यानंतर तो फुटला. मी मुख्यमंत्र्यांना म्हणालो, आपल्याला उमेदवाराला तयार करायला थोडा वेळ लागला त्यामुळे मला तीन वेळा तो नारळ आपटावा लागला", असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

Devendra Fadanvis
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर नितेश राणे 24 तासांतच शरण

राजेश पाटणेकर सुरुवातीला विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक नव्हते. मात्र अखेरच्या क्षणी त्यांची मनधरणी यशस्वी झाल्याने ते आता मैदानात उतरले आहेत. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राजेश पाटणेकर आता मैदानात उतरले आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर कोणीच टिकणार नाही. आता पाटणेकरच निवडून येणार. गोव्यातील सर्वसामान्यांशी जोडलेला, down-to-earth अशा प्रकारचा नेता म्हणून पाटणेकरांची प्रतिमा आहे. त्यांच्याकडे एक प्रदीर्घ अनुभव आहे, असे म्हणत फडणवीसांनी पाटणेकरांचे कौतुकही केले आहे.

Devendra Fadanvis
ममतांना मोठा धक्का! गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी घेतली माघार

मात्र यावेळी पुढे बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या पाटणेकर यांच्या रुपाने गोव्यातील पहिल्या मंत्र्यांचे नाव घोषित केले आहे. ते म्हणाले, आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी परवा बोलताना सांगितले, तुम्ही पाटणेकरांना सभापती म्हणून पाठवा. पण ते परत जेव्हा येतील तेव्हा मंत्र्यांच्या गाडीतून बसूनच येतील. त्यामुळे तुमचं आता चांगलं आहे, एका बाजूला मुख्यमंत्री, दुसऱ्या बाजूला मंत्री. म्हणजे एका तालुक्यात तुम्ही काय-काय करणार आहात हे लक्षात येत नाही, पण चांगले आहे. खरोखरचं पाटणेकर एक चांगला माणूस आहे, त्यामुळे मुख्यमंत्री जे म्हणाले ते खरंच आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com