Bihar Election Results: फडणवीसांनी बिहारमध्ये प्रचार केलेल्या उमेदवाराचं काय झालं? असा आहे स्ट्राईक रेट

Devendra Fadnavis Bihar Vidhan Sabha Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहा ठिकाणी सभा घेतल्या होत्या. त्या मतदार संघातील उमेदवारांच्या निकाल काय आहेत, हे जाणून घेऊयात
Devendra Fadnavis Bihar Vidhan Sabha Result 2025
Devendra Fadnavis Bihar Vidhan Sabha Result 2025Sarkarnama
Published on
Updated on

Bihar Election: बिहार विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे स्टार प्रचारक म्हणून दौऱ्यावर होते. फडणवीसांनी सहा विधानसभा मतदारसंघात एनडीएच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या.

फडणवीस यांनी बिहार दौऱ्यात केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्यासोबत, मोहिउद्दीननगर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राजेश कुमार सिंह, कुढनी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार केदार प्रसाद गुप्ता, सिमरी बख्तियारपूर विधानसभा मतदारसंघाचे एनडीएचे उमेदवार संजय कुमार सिंह, परबत्ता विधानसभा मतदारसंघाचे एनडीएचे उमेदवार बाबूलाल शौर्य, फुलवारी विधानसभा मतदारसंघाचे एनडीएचे उमेदवार श्याम रजक, उजियारपुर विधानसभा मतदारसंघाचे एनडीएचे उमेदवार प्रशांत कुमार पंकज यांच्यासाठी सभा घेतल्या होत्या. या मतदारसंघातील चित्र काय आहे ते जाणून घेऊया!

मोहिउद्दीननगर विधानसभा मतदार संघात BJPचे उमेदवार राजेश कुमार सिंह हे 7691 पेक्षा अधिक मतांनी आरजेडीचे उमेदवार ईजा यादव यांच्या पिछाडीवर आहेत. भाजप समर्थकांना हा मोठा धक्का आहे.

राजकारणात विशेष महत्व असलेल्या कुढनी विधानसभ मतदारसंघ भाजपचे केदार गुप्ता पिछाडीवर आहेत. येथे जेडीयूचे उमेदवार सुनील कुमार सुमन हे 2170 मतांनी पुढे आहेत.

Devendra Fadnavis Bihar Vidhan Sabha Result 2025
Kolhapur Politics: विधानपरिषदेच्या इच्छुकाला पत्नीच्या नगराध्यक्षपदाचे गाजर? वरिष्ठांच्या दबावाला झुकणार की झुकवणार

बिहारच्या सिमरी बख्तियारपुर विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येथे RJDचे उमेदवार युसुफ सल्लाउद्दीन यांना मोठा झटका बसला आहे. ते 14 हजार 682 मतांनी पिछाडीवर आहेत. येथे एनडीएचे उमेदवार संजय कुमार सिंह आघाडीवर आहेत.

परबत्ता विधानसभा मतदारसंघात एनडीएचे उमेदवार बाबूलाल शौर्य (Babulal Shorya)यांच्या त्यांचे प्रतिस्पर्धी RJD उमेदवार यांनी झटका दिला आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत डॅा. संजीव कुमार यांच्यापेक्षा ते साडेचार हजार मतांनी आघाडीवर आहेत.

फुलवारीमध्ये जेडीयू आणि CPI(ML)(L) मध्ये कांटे की ठक्कर आहे. जेडीयूचे उमेदवार श्याम रजक यांना 58 हजार 213 मते मिळाली आहे. CPI(ML)(L) चे उमेदवार गोपाल रवी दास यांना 55 हजार 260 मते मिळाली आहेत.

उजियारपुर विधानसभा मतदारसंघात RJDचे उमेदवार अलोक कुमार मेहता यांना 80, 168 मते मिळाली असून ते आघाडीवर आहेत. एनडीएचे उमेदवार प्रशांत कुमार पंकज दुसऱ्या स्थानावर आहेत. त्यांना 69, 821 मते मिळाली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com