मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने ड्रग्जचा खेळ सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत केला. यावरुन आता राजकारण चांगलंच तापलं आहे. फडणवीसांनी मलिकांच्या आरोपांचे खंडन केलं आहे. फडणवीस माध्यमांशी बोलत होते.
फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, दिवाळीची सुरवात मलिकांनी (Nawab Malik)लवंगी फटाक्यांनी केली आहे. पण दिवाळीनंतर मी बॉम्ब फोडणार आहे. मी काचेच्या घराच राहत नाही. दिवाळी संपण्याची वाट पाहा. अंडरवर्ल्डशीसोबत मलिकांचे असलेल्या संबधांचे पुरावे मी राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार आहे. मलिक यांनी आज टि्वट केलेला फोटो चार वर्षापूर्वीचा आहे. त्याचे माझ्यासोबतही फोटो आहेत, पण त्यांनी जाणीवपूर्वक माझ्या पत्नीसोबतचा फोटो टि्वट केला आहे. मलिक यांच्या जावायाकडे ड्रग्ज सापडले, तर सर्वच राष्ट्रवादी ड्रग्ज माफीया आहे का?
फडणवीस यांच्याकडून ड्रग्ज रॅकेटला संरक्षण मिळत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला असून याची सीबीआय किंवा न्यायालयीन समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मलिक यांनी सोमवारी सकाळी अमृता फडणवीस यांचा एका व्यक्तीसोबतचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. त्या फोटोमध्ये असलेली व्यक्ती ड्रग्ज पेडलर असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. जयदीप राणा (Jaydeep Rana) असं या व्यक्तीचे नाव आहे. निशांत वर्मा या राजकीय विश्लेषकांनीही हा फोटो ट्विट केला आहे. त्याला काही दिवसांपूर्वीच अटक कऱण्यात आली आहे, अशी माहिती मलिक यांनी दिली.
सार्वजनिक जीवनात कोण कुणाच्या सोबत फोटो काढतं, यावर आपला काहीच आक्षेप नाही. पण एक ड्रग्ज पेडलर मुख्यमंत्र्यांचा अभिनय असलेल्या गाण्याला फायनान्स करतो, यावरूनच सर्व स्पष्ट होतो. देवेंद्रजींचे जयदीप राणाशी असलेले नाते घनिष्ठ आहे. गणपती दर्शनासाठी राणा व फडणवीस एकत्र होते. महाराष्ट्रातील ड्रग्जच्या मोठ्या साखळीशी याचा संबंध आहे. भाजपचे लोक का सुटत आहेत. त्यांच्या नाकाखाली ड्रग्जचा धंदा सुरू होता. भाजपात काही ड्रग्जशी संबंधित लोक आहेत. डॅग्जचा खेळ कुठे ना कुठे देवेंद्रजींच्या आशिर्वादाने सुरू होता.
''अरुण हलदर यांनी वानखेडें (Sameer Wankhede) यांच्या घरी जाऊन कागदपत्रे तपासली. त्यांना ही कागदपत्रे तपासणीचा अधिकार नाही. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. अशा प्रकरणातील कागदपत्रे तपासण्याचा अधिकार अरुण हलगर यांना नाही. याबाबत आम्ही सामाजिक न्यायविभागाकडे आणि राष्ट्रपतीकडे तक्रार करणार आहोत,'' असे मलिक यांनी यावेळी सांगितलं
''अरुण हलदर (Arun Halder) त्याचे वर्तन संशयास्पद आहे. त्यांची चैाकशी झाली पाहिजे. काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासोबत काल वानखेडेंचे कुटुंबाने भेट घेतली. त्यावेळी माझ्यावर काही आरोप करण्यात आले. पण मी वानखेडेच्या दुसऱ्या पत्नीची नाव घेतलेले नाही. त्यांच्या मुलाचे नाव घेतलं नाही. मी कोणतीही व्यक्तीगत टीका केली नाही,'' असे मलिक यांनी यावेळी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.