मोठी बातमी : अयोध्येतील राम मंदीर भक्तांना कधी होणार खुलं? तारीख आली समोर 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी पाच ऑगस्ट रोजी मंदीर उभारणीच्या कामाची सुरूवात झाली.
Devotees are expected to be allowed entry in Ram Mandir by 2023 end
Devotees are expected to be allowed entry in Ram Mandir by 2023 end
Published on
Updated on

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम वेगात सुरू असून भक्तांसाठी लवकरच मंदिराचे दरवाजे उघडणार आहेत. श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने याबाबत माहिती दिली आहे. नियोजनानुसार मंदीर उभारणीचे काम सुरू असून डिसेंबर 2023 मध्ये भक्तांना प्रवेश मिळेल, असं मंदीर ट्रस्टने म्हटलं आहे. (Devotees are expected to be allowed entry in Ram Mandir by 2023 end)

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मागील वर्षी पाच ऑगस्ट रोजी मंदीर उभारणीच्या कामाची सुरूवात झाली. मंदीर उभारणीच्या कामाला सुरूवात होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. नियोजनानुसार काम सुरू आहे. कारसेवक पुरम येथील 70 टक्के दगड मंदिराच्या कामासाठी वापरले जातील. या कामात स्टील किंवा विटांचा वापर केला जात नाही. 

मंदिराप्रमाणे संग्रहालय, संशोधन केंद्र, डिजिटल अर्काईव्ह, कॉम्पलेक्स आदी इमारतींची उभारणीही केली जाणार आहे. भक्तांना राम मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये भक्तांसाठी प्रवेश खुला केला जाईल, असं ट्रस्टनं म्हटलं आहे. मंदिरासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे. 

दरम्यान, राम मंदिरासाठी निधी जमा करण्यासाठी राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतगर्त अंदाजित खर्चाच्या दीडपट जास्त म्हणजे २ हजार १०० कोटी रुपयांच्या देणग्या जमा झाल्या आहेत. विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) ही माहिती जाहीर केली आहे. राम मंदिरासाठी अकराशे कोटी रुपांचा खर्च होईल, असा अंदाज होता. नंतर हा अंदाज वाढून दीड हजार कोटीपर्यंत गेला. विश्व हिंदू परिषदेचे महासचिव चंपत राय यांच्या माहितीनुसार हा खर्च आणखीही वाढू शकतो. 

विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरासाठी यावर्षी संक्रांतीपासून देशभरात देणगी संकलनाची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेची सांगता झाली असून याअंतर्गत मंदिरासाठी २ हजार १०० कोटी रुपये जमा झाले आहेत. समर्पण निधीच्या १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी या ४४ दिवसांच्या कालावधीती देशविदेशातील कोट्यवधी लोकांनी देणग्या दिल्या. श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज म्हणाले, अनेक लोकांनी देणग्या देऊ केल्या आहेत. पण खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने त्या स्वीकारायच्या की नाही याचा निर्णय जन्मभूमी मंदिर ट्रस्टच्या पुढील बैठकीत घेण्यात येईल. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com