Threats To Court judge : अबब! थेट हायकोर्टाच्या सहा न्यायाधीशांना उडवण्याची धमकी; 'खंडणी दिली नाही तर...'

Death Threats To Six High Court Judges : "भारतात आमचे शूटर आहेत.."
Threats To Court judge :
Threats To Court judge :Sarkarnama
Published on
Updated on

Karnataka News : कर्नाटक राज्य उच्च न्यायालयाच्या (Karnatka High Court) सहा न्यायाधीशाना जीवे मारण्याची धमकी देण्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे. न्यायालय जनसंपर्क अधिकारी (PRO) यांच्या मोबाईल फोनवर व्हाईल कॉलद्वारे ही धमकी देण्यात आली आहे. इतकेच नाही तर धमकीचा संदेश व्हॉट्अॅपवरही पाठवण्यात आला आहे. न्यायाधीशांनाच देण्यात आलेल्या या संदेशामुळे एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आता धमकी देणाऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे . (Latest Marathi News)

Threats To Court judge :
कोणतं आभाळ कोसळणार होतं? वानखेडेंच्या याचिकेवर उच्च न्यायालय भडकलं

कर्नाटक उच्च न्यायालयाचे जनसंपर्क अधिकारी मुरलीधर यांनी याबाबत तक्रार केली आहे, त्यानुसार १२ जुलै या दिवशी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात इसमाने फोन करून धमकी दिली आहे. न्यायालयाच्या व्हॉट्सअॅप क्रमाकारवरही धमकीच्या आशयाचा संदेशही पाठवण्यात आला. या धमकीमध्ये आरोपीने पाकीस्तानातील एबीएल बँकेचा (अलाईड बँक लिमिटेड) खात्यावर ५० लाख रूपये जमा करण्याची धमकी देण्यात आली.

५० लाख रूपये न दिल्यास उच्च न्यायालयाच्या सहा न्यायाधीशांना ठार मारण्यात येईल, अशी धमकी व्हॉट्सअॅपच्या संदेशात धमकी देण्याऱ्याने नमूद केले आहे. ठार मारण्याची धमकी मिळालेल्या या सहा न्यायाधीशांमध्ये मोहम्मद नवाज, एचटी नरेंद्र प्रसाद, अशोक निजगन्नानवर, एचपी संदेश, के नटराजन आणि वीरप्पा यांचा समावेश आहे.

Threats To Court judge :
Supreme Court hearing : जुने सरकार किंवा जुने अध्यक्ष परत आणा, सिब्बलांच्या या युक्तीवादावर न्यायाधीश म्हणाले...

तीन भाषांमध्ये धमकी :

अज्ञात आरोपीने या धमकीचा संदेश तीन भाषांमध्ये पाठवला आहे. हिंदी, उर्दू आणि इंग्रजी भाषेत हा संदेश जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या नंबरवर आला. या धमकीबरोबरच आरोपीने काही मोबाईल नंबरही व्हॉट्सअॅपवर पाठवले, असे मुरलीधर यांच्या तक्रारीत नमूद आहे. हे नंबर आमच्या शूटरचे आहेत, असा दावा त्यात करण्यात आला आहे. 'इंडिया टुडे'नं याबाबतचं वृत्त दिलं होतं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com