Shiv Sena Party Crisis : मोठी बातमी ! ठाकरेंना झटका; सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर...

Maharashtra Political Crisis : याचिकेवर आज सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र...
Shiv Sena Party Crisis
Shiv Sena Party CrisisSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाचे? यावर आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती. मात्र, आता हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट झाले.

शिवसेना ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्षाबाबतच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. याच याचिकेवर आज सुनावणी होणे अपेक्षित होते. मात्र, आता यावर आज सुनावणी होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

निवडणूक आयोगाने १७ फेब्रुवारी रोजी एक अंतिम निकाल शिवसेनेच्या वादावर दिला होता. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे गटाला दिले गेले होते. आयोगाच्या याच निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या सोळाव्या क्रमांकावर हे प्रकरण होते. मात्र, आज ही सुनावणी होणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल ११ मे रोजी आला. या निकालात राजकीय पक्षाचं महत्त्व सुप्रीम कोर्टाने अधोरेखित केले होते. ज्या प्रकारे पक्षाचा प्रतोद आणि गटनेतेची नियुक्ती झाली होती, त्यावर कोर्टाने निरीक्षण नोंदवलं होतं. या सर्व पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्ट काही निवडणूक आयोगाबद्दल काही मत नोंदवतंय का? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. मात्र, आज होणारी सुनावणी टळल्याने ठाकरे गटाची निराशा झाली आहे.

(Edited by - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com