काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्विस्ट; आता माजी मुख्यमंत्र्याच्या नावाची चर्चा

काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत दिवसेन दिवस वाढत आहे.
congress
congresssarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रंगत दिवसेन दिवस वाढत आहे. गांधी परिवार अध्यक्षपदाच्या निवडणुकीपासून दूर राहणार आहे. खासदार शशी थरुर (Shashi Tharoor) यांनी यापूर्वीच निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलेले आहे. राज्यस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, राजस्थानमधील सत्ता संघर्षाचा त्यांना फटका बसणार असल्याचे सांगितले जात आहे.

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचे नाव चर्चेत आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेले दिग्विजय सिंह दिल्लीत परतणार आहेत. ते उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

congress
इतिहास तर चिन्ह गोठविण्याचाच ; शिवसेनेच्या धनुष्यबाणाचे काय होणार ?

काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत थरुर आणि गेहलोत यांची नावे आघाडीवर होती. मात्र, राजस्थानातील राजकीय घडामोडींनतर गेहलोत यांच्या नावाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. थरुर हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे, त्या दिवशी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

राजस्थानातील सत्तासंघर्षापूर्वी थरुर आणि गेहलोत यांची नावे आघाडीवर होती. राजस्थानातील घटनाक्रमानंतर खासदार मुकुल वासनिक, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे, के. सी. वेणुगोपाल यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. यामध्ये माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

congress
महापालिका निवडणुका कधी? दोन आठवड्यानंतर निर्णय; शिंदे सरकारला दिलासा

दिग्विजय सिंह यांच्याकडे प्रशासनिक आणि संघटनात्मक अनुभव आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दिग्विजय सिंह यांनी दोनवेळा काम केले आहे. गांधी परिवाराचे निष्ठावंत म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. राजस्थानातील घडामोडींवर मल्लिकार्जून खर्गे आणि अजय माकन यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे लेखी अहवाल सादर केला आहे. त्यामुळे अशोक गेहलोत यांच्या नावावर संभ्रम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com