नवी दिल्ली : महागाई कमी झाली नसतानाही यंदा दिवाळीमध्ये उलाढालीचे उच्चांक स्थापन झाले आहेत. देशभरात यंदा १.२५ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. गेल्या दहा वर्षातील हा उच्चांक आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)च्या पदाधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे diwali festive sale crosses rs1.25 trillion breaks all 10 year records says CAIT
देशभरात १.२५ लाख कोटींची उलाढाल
सत्तर मिलियन व्यापाऱ्याचे प्रातिनिधित्व करणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT)ने राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया आणि महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदाच्या या उच्चांकी उलाढालीमुळे दोन वर्षापासूनची व्यापाऱ्यांची असलेली आर्थिक मंदी संपली आहे. अशीच परिस्थिती असली तर भविष्यात उद्योगपती-व्यापाऱ्यांची प्रगती वेगाने होईल. दिवाळी देशभरात १.२५ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. एकट्या दिल्लीत २५ लाख कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे.
मातीचे दिवे, सजावटीच्या वस्तूंना मागणी
भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळीत भारतीय बाजारपेठेत चायना मालाची विक्री झाली नाही. नागरिकांनी भारतीय वस्तूंचीच खरेदी केली. त्यामुळे चीनचे ५० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळीत पारंपरिक वस्तू म्हणजे मातीचे दिवे, विविध रंगीत सजावटीच्या वस्तू, पेपर, आकर्षक दिवे यांना चांगली मागणी होती. त्यामुळे देशातील कुंभार, हस्तकारागिर यांनी तयार केलेल्या वस्तूंना मागणी वाढली होती. मिठाई, सुकामेवा, घड्याळ, खेळणी, घराच्या सजावटीसाठी लागणाऱ्या वस्तू, फॅशनच्या वस्तू, कपडे यांना विशेष मागणी होती. यंदा चायना वस्तूंना नकार देत नागरिकांनी 'चीन- चीन' नव्हे तर, 'दिन-दिन' दिवाळी' म्हणत दीपोत्सव साजरा केला.
चांदीची भांडी खरेदीकडे कल
सोन्याचे दागिने, चांदीची भांडी खरेदीकडे नागरिकांचा विशेष कल होता, या खरेदीमधून ९ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे भरतिया आणि खंडेलवाल यांनी सांगितलं. या सर्व उच्चांकी उलाढालीनंतर देशातील व्यापाऱ्यामध्ये उत्साहाचे वातावरण असून भविष्यात नवीन व्यापारी धोरण तयार करुन व्यापार वाढविण्यासाठी यामुळे चालना मिळाली आहे, असा विश्वास भरतिया आणि खंडेलवाल यांनी व्यक्त केला आहे.
ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीतही वाढ
रेडसिर कॅन्स्लटिंगच्या (RedSeer Consulting) अभ्यासानुसार, ऑनलाइन फेस्टिव सेलच्या माध्यमातून पहिल्या आठवड्यात विविध ई-कॉमर्स कंपन्यांनी केलेल्या विक्रीतही वाढ झाली आहे. यंदा यात २३ टक्के वाढ झाली आहे. ४.६ बिलियन डॅालर( ३२ हजार कोटी रुपये)ची उलाढाल विविध कंपन्यांनाची ऑनलाइन फेस्टिव सेलमधून झाली आहे. Amazon आणि Flipkart यांनी मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली आहे. Amazon आणि Flipkartचा चा महिनापासून अनुक्रमे 'ग्रेट इंडियन फेस्टिवल (GIF), Flipkart The Big Billion Days हा सेल सुरु होता. अँमेझॉनवर पहिल्यादांच १० लाखापेक्षा अधिक जणांनी मोबाईलची खरेदी केली. यात ६ पैकी ४ स्मार्टफोन व ४ पैकी १ टिव्ही हा Alexa Built in चा होता. प्रत्येक मिनिटाला १२० पेक्षा जास्त ऑडियो उत्पादनांची विक्री झाली.
चीनी मालाची खरेदी विक्री न करण्याचे आवाहन
गेल्या दोन वर्षांत खरेदीची फारशी संधी न मिळाल्याने ग्राहक यावर्षी दिवाळीनिमित्त मोठ्या प्रमाणात खरेदी करत असल्याचे पहायला मिळत आहे. या काळात एक लाख कोटींच्या आसपास आर्थिक उलाढाल अपेक्षित असल्याचे व्यापारी संघटना कॅटने म्हटलं होतं. गेल्या तीन वर्षांपासून कॅटच्या वतीने चीनी मालावर बहिष्कार घालण्याचे अभियान सुरू आहे. हे अभियान अजूनही सुरूच असून, या अभियानांतर्गत आम्ही व्यापाऱ्यांना चीनी मालाची खरेदी विक्री न करण्याचे आवाहन करत आहोत, अशी माहिती भरतिया यांनी दिली
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.