नवी दिल्ली : आगामी विधानसभेची रणधुमाळी उत्तरप्रदेशमध्ये सुरु झाली आहे. सर्वच पक्षानी जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजपनेही उत्तरप्रदेशची सत्ता पुन्हा राखण्यासाठी कंबर कसली आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm Narendra Modi) हे लखनऊमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, यामुळे पोलिसांनी (up police) काढलेल्या एका अजब फतव्यामुळे लखनऊमधील नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मोदींच्या उपस्थितीत लखनऊ शहरातील गोमतीनगर परिसरातील सरस्वती अपार्टमेंटसमोर हा कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने पोलिसांचा चोख बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला आहे. कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेत आहेत. याबाबत पोलिसांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
गोमतीनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत कुमार मिश्रा यांनी स्थानिक सर्व इमारतीमधील रहिवाशांना हे पत्र पाठवले आहे. हे पत्र हाती पडताच नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या पत्राची खिल्ली उडवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा होईपर्यंत (१९ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर) त्यांत्या सुरक्षेसंदर्भातील उपाययोजनांचा उल्लेख पोलिसांनी या पत्रात केला आहे. मोदींचा कार्यक्रम ज्या ठिकाणी आहे त्या परिसरात स्थानिक नागरिकांनी काय करावे, काय काळजी घ्यावी. याबद्दलच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक सूचनामध्ये एक सूचना गंमतीदार असल्याने त्यावरुन सोशल मीडियावर गप्पा रंगल्या आहेत. सूचनांमध्ये एक सूचना कपडे वाळत घालण्याबद्दल आहे.
'खिडकीमध्ये, बाल्कनीत कपडे वाळत घालू नका,' अशी सूचना या पत्रात देण्यात आली आहे. नागरिकांनी चार दिवस आपल्या घराच्या बाल्कनी आणि खिडकीमध्ये कपडे वाळत घालू नये , कोणतीही गोष्ट लटकवून ठेऊ नका, आपल्या इमारतीमध्ये नवीन कुणी रहायला आल्यास तत्काळ पोलिसांना कळवा, अशा सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.