Former MP Anand Mohan singh released jail : गॅगस्टार, माजी खासदार आनंद मोहन याची बिहारच्या सहरसा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहाचे नियम बदलून डॉन आनंद मोहन सिंह याची सुटका केल्याचा आरोप नीतीश कुमार सरकारवर करण्यात येत आहे. यावरुन बिहारचे राजकारण पेटलं आहे.
विरोधीपक्षाने मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नीतीश कुमार यांनी एका गुन्हेगाराच्या सुटकेसाठी कारागृहाच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आनंद मोहन यांच्यावर एका सनदी अधिकारी जी कृष्णय्या यांचा खून केल्याचा आरोप आहे. त्याच्या सुटकेनंतर जी कृष्णय्या यांची कन्येने नीतीश कुमार यांच्या या निर्णयाच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याचे म्हटलं आहे.
आनंद मोहनच्या सुटकेवर झालेल्या गदारोळाला उत्तर देताना त्याने भाजपवर टीकास्त्र सोडले. "गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील काही दोषींची सुटका झाली आहे. तेही नितीश-आरजेडीच्या दबावामुळेच का?" असा मिश्कील सवाल आनंद मोहन सिंहने केला.
बिहार सरकारने कारागृहाच्या नियमात नुकताच बदल केला आहे. त्यामुळे आनंद मोहन याच्यासह २७ आरोपींची सुटका केली आहे. आनंद मोहन याला १९९४ मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गोपालगंज येथील तत्कालीन जिल्हाधिकारी जी कृष्णय्या यांचा खून केला होता. याप्रकरणी न्यायालयाने त्यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
1994 मध्ये आनंद मोहन सिंहने चिथावणी दिलेल्या जमावाने जी. कृष्णैय्या (G. Krishnaiah) यांची हत्या केली होती. त्यांना त्यांच्या गाडीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केल्यानंतर त्यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. ते १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी होते. या प्रकरणात आनंद मोहनला 2007 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. एका वर्षानंतर म्हणजेच, 2008 मध्ये पाटणा उच्च न्यायालयाने ही शिक्षा जन्मठेपेत बदलली.
मागील 15 वर्षांपासून आनंद मोहन सिंह हा तुरुंगात होता.
आनंद मोहन याने शिक्षेच्या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
आजपर्यंत कोणताही दिलासा न मिळाल्याने तो सहरसा तुरुंगात शिक्षा भोगत होता.
त्याची पत्नी लवली आनंद याही लोकसभा खासदार राहिल्या आहेत.
त्याचा मुलगा चेतन आनंद बिहारमधील शिवहारमधून आरजेडीचा आमदार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.